Homeताज्या बातम्याहडपसर विधानसभा मतदार संघातून मुस्लिम समाजाने थोपटले दंड ; हडपसर मधुन महाविकास...

हडपसर विधानसभा मतदार संघातून मुस्लिम समाजाने थोपटले दंड ; हडपसर मधुन महाविकास आघाडीकडे हाजी रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी…

महाविकास आघाडीने मुस्लिम व अल्पसंख्यांकांना 15 टक्के उमेदवारी जाहीर करण्याची मागणी…
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कडून मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाच्या घटकांना सत्तेतील भागीदारी देण्याच्या उद्देशाने 15 टक्के उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अघ्यक्ष रशिद शेख यांनी आज पुणे येथे पुणे मुस्लिम कॉन्फ्रेंस या मुस्लिम समाजची बैठकी मध्ये जमियत उलमा पुणे, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी, इंकिलाब सोशल मूवमेंट, सर्व मुस्लिम सामाजिक कार्यकर्ता व समक्ष मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत घेण्यात आली या कॉन्फरन्सचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक मुस्लिम समाजाचे मौलवी, धर्मगुरू व इतर मान्यवर होते.
                     👇👇 पहा व्हिडीओ 👇👇
👆👆 पहा व्हिडीओ 👆👆
मुस्लिम समाजाचे मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यांची फक्त एकच घोषणा आहे की,
कब तक मुस्लिम सामाज सिर्फ वोट बन कर रहेंगा.
हमें सत्ता में हिस्सेदारी कब मिलेगी अगर हमें आप हिस्सेदारी नही देंगे तो हम महा विकास आघाडी का साथ इस विधान सभा चूनाव में नहीं देंगे
या मागणीवर आघाडीच्या सर्व नेत्यांनी लक्ष्य द्यावे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान वाचविणे व देशातील धार्मिक ध्रुवीकरणाचे वातावरण संपवावे या उद्देशाने मुस्लिम व इतर अल्पसंख्यांक समुदायाने देशभरात इंडिया अलाईन्स व राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचा जोरदार पराभव केलेला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही अटी व शर्ती शिवाय मुस्लिम  समुदायाने केलेल्या मतदानाच्या अनुषंगाने तसेच योग्य प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या निमित्ताने करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे. पंधरा टक्के प्रतिनिधीत्वाच्या मागणीचे  निवेदन राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, तसेच  नानासाहेब पटोले यांना लिखित स्वरूपात पाठवण्यात आल्याची माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिली यावेळी  ” अल्पसंख्यांक समुदायाला या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करून नेमक्या किती जागा मिळणार आहेत ? याची आकडेवारी त्यांनी 22 ऑक्टोंबर पर्यंत जाहीर करणे अपेक्षित आहे.” असे देखिल डंबाळे यांनी सांगितले.
“पश्चिम महाराष्ट्रातून हडपसर मतदार संघ मुस्लिमांसाठी सुरक्षित असल्याने या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या उमेदवारीमुळे जवळपास पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात व पश्चिम महाराष्ट्रातील 84 मतदार संघात याचा सकारात्मक संदेश जाणार असल्याने महाविकास आघाडीने माझ्या उमेदवारी बाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा या पत्रकार परिषदेतुन रशिद शेख यांनी व्यक्त केली. दरम्यान निवडणुकीसाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली असून या अनुषंगाने मतदारसंघात 20 पेक्षा अधिक बैठका घेऊन व्यापक सहमती मिळवण्यात आल्याचे ही रशिद शेख यांनी सांगितले.
योग्य प्रतिनिधीत्व न दिल्यास महाविकास आघाडीचा हक्काचा मतदार नाराज होऊन तो आपला असंतोष अन्य मार्गाने व्यक्त करण्याची शक्यता आहे. हरियाणा येथे भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय हा धक्कादायक स्वरूपाचा असून इंडिया अलायन्सच्या धरसोड वृत्तीमुळे अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष मतदारांच्या नाराजीचाच हा फटका आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे आम्हाला वाटते त्यामुळे महाविकास आघाडीने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. अशी भुमिका मुस्लिम नेते जाहीद शेख यांनी मांडली.
हडपसर मधुन रशिद शेख यांच्या उमेदवारीची मागणी
हडपसर विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व अल्पसंख्यांक समाजाचे नेते रशीद शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन जमीयत ए उलमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती शाहीद  यांच्या नेतृत्वा खाली शिष्टमंडळाने केली आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा अशी भुमिका मुफ्ती शाहीद यांनी मांडली.
राज्यातील 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक स्वरूपात असून स्वबळावर 20 ते 22 जागांवर ते निवडून येण्याची खात्री आहे व तशी चाचणी देखील स्थानिक इच्छुक उमेदवाराकडून सुरू आहे. अशी माहीती नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे सरचिटणीस लुकास केदारी यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

error: Content is protected !!