HomeमनोरंजनDharmendra DeolDeath“भारतीय सिनेसृष्टीचा कोहिनूर हरपला; धर्मेंद्र यांचे निधन”

Dharmendra DeolDeath“भारतीय सिनेसृष्टीचा कोहिनूर हरपला; धर्मेंद्र यांचे निधन”

Times of Maharashtra Desk, Dharmendra DeolDeath: सहा शतके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कोहिनूर आज हरपला. बॉलीवूड सुपरस्टार धर्मेंद्र देओल यांचे वयाच्या ८९ वर्ष निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेद्र यांची प्रकृती गंभीर होती त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांची जीवन ज्योत मावळली असून बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ गेल्यामुळे संपूर्ण सिने सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

“शोलेचा वीरू ते हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘ही-मॅन’ : धर्मेंद्र”

पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र जन्माला आले. त्यांचे खरे नाव धरम सिंग देओल पण त्यांच्या अभिनयाने त्यांना धर्मेंद्र ही ओळख दिली . एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या धर्मेंद्रना अभिनयाचे वेड होते . १९६० मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि त्यानंतर शोले, चूपके-चूपके, सत्यकाम, सुजाता तसेच इतर ३०० हून अधिक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. शोशोलेमधील त्यांची “वीरू” ही भूमिका आजही भारतीय चित्रपटविश्वात अमर मानली जाते. दिलीप कुमार यांच्या प्रेरणेने त्यांनी अभिनयात कारकीर्द घडवली आणि संघर्षाच्या दिवसांत मुंबईत अनेक अडचणींना तोंड देत यशस्वी प्रवासाला सुरुवात केली.१९६० ते १९८० या काळात ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय हिरो बनले. त्यांच्या रोमँटिक भूमिकांनी लाखो हृदयं जिंकली. धर्मेंद्र यांनी फक्त हिरोच नाही तर प्रोड्यूसर म्हणूनही काम केले आणि घायल, दिल्लगी, सोल्जर यांसारख्या चित्रपटांच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.धर्मेंद्र यांना १९९७ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर २००४ मध्ये त्यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारला. साधेपणा, मेहनत आणि अभिनय कौशल्यामुळे “ही-मॅन” म्हणून ख्याती मिळवलेला हा दिग्गज कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्यांचा वारसा सदैव चमकत राहील.त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!