Homeताज्या बातम्याUmarga election , Banner Controversy: “उमरगा निवडणुकीत बॅनर वाद: शिंदे–राहुल–सोनिया एकत्र...

Umarga election , Banner Controversy: “उमरगा निवडणुकीत बॅनर वाद: शिंदे–राहुल–सोनिया एकत्र दिसल्याने राज्यात नवा राजकीय भूचाल”

Times of Maharashtra Desk, Umarga election: महाराष्ट्रात एका निवडणूक बॅनरवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे (यूबीटी) ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना एकत्र दाखवणारा एक निवडणूक बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दानवे यांनी हा फोटो शेअर करून शिंदेंवर थेट हल्लाबोल करत आरोप केले आहेत.

काय म्हणाले अंबादास दानवे? 
उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर हे बॅनर शेअर केले आहे.
काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत-गुवाहाटी-गोवा असो पळपुटा प्रवास केलात आणि नाकाने वांगे सोलले..
आता घ्या! कटप्रमुख एकनाथ शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर.. ते ही धनुष्यबाण चिन्हासह!
थोडक्यात, दिल्लीश्वरांच्या भीतीने ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीला टांगले आहेत.
– याला म्हणतात बुडाखालील अंधार !
अशी जोरदर टीका करत एक बॅनर शेयर केला आहे. त्या बॅनर मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे फोटो आहेत. महत्त्वाचे म्हणजे, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे “धनुष्यबाण” हे निवडणूक चिन्ह देखील बॅनरवर स्पष्टपणे दिसत आहे. ही बॅनर उमरगा नगरपरिषद निवडणूक प्रचाराशी संबंधित आहे. त्यावर लिहिले आहे की, “शिवसेना-काँग्रेस-लहुजी शक्ती सेना-रयत क्रांती आणि मित्र शहर विकास पॅनल हे महापौरपदाचे आणि प्रभाग क्रमांक २ चे अधिकृत उमेदवार आहेत.” यावरून स्पष्ट होते की स्थानिक पातळीवर महाआघाडीत (महायुती) असामान्य आणि गुंतागुंतीची राजकीय समीकरणे तयार होत आहेत.

शिंदे गटावर राजकीय टीका
दानवे यांनी आरोप केला की, बंड करताना शिंदे गटाने दावा केला होता की ते बाळासाहेबांच्या आदर्शांचे रक्षण करत आहेत, परंतु आता ते काँग्रेस नेत्यांसोबत बॅनरवर दिसत आहेत. या घडामोडीमुळे भाजप-शिंदे युती आणि स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या राजकीय समीकरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक ठिकाणी, युतीत राहूनही, स्थानिक निवडणुका काँग्रेसशी युती करताना दिसतात आणि या मुद्द्यावरून शिंदे गटावर तीव्र राजकीय टीका होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय चले असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!