Homeताज्या बातम्याIIT Bombay to IIT Mumbai Name Change Controversy: "आयआयटी बॉम्बे वादाला...

IIT Bombay to IIT Mumbai Name Change Controversy: “आयआयटी बॉम्बे वादाला नवे वळण: फडणवीस नावबदलाची मागणी करणार”

Times of Maharashtra Desk, Mumbai vs Bombay : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या व्यक्तवामुळे निर्माण झालेला आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे ह्या वादाने आता नवीन वळण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे ठेवण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.पूर्वी बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचे १९९५ मध्ये मुंबा देवीच्या सन्मानार्थ आणि ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा ठसा पुसण्यासाठी राज्य सरकारने अधिकृतपणे मुंबई असे नामकरण केले.आणि त्यानंतर सर्वांसाठी बॉम्बे मुंबई बनली.

“सुदैवाने, आयआयटी बॉम्बेचे नाव अजूनही तेच आहे. तुम्ही ते बदलून मुंबई केलेले नाही. तर तुमच्यासाठी ही आणखी एक प्रशंसा आहे. आणि मद्राससाठीही तेच खरे आहे. ते अजूनही आयआयटी मद्रास आहे.” केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद उठला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर निशाणा साधला होता. त्यात ते म्हणाले मराठी नेत्यांनी आणि जनतेने नेहमीच मराठी लोकांची असलेली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट उधळून लावला आहे.

“आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्यामुळे त्यांच्या हृदयात अनेक दशकांपासून असलेली कटुता आता पुन्हा समोर येत आहे.”मुंबईतील लोकांनी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या सर्व मराठी लोकांनी आता डोळे उघडले पाहिजेत.मुंबई हे नाव सत्ताधारी पक्षाला त्रास देते कारण ते मुंबईच्या देवी मुंबा देवी यांच्या नावावरून ठेवले आहे. तिचे वंशज मराठी लोक आहेत जे पिढ्यानपिढ्या येथे राहत आहेत. ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने पंजाबच्या ताब्यातून चंदीगड हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर सर्व पक्षांच्या विरोधानंतर ते मागे हटले. ते म्हणाले की, ही माघार तात्पुरती होती.”मुंबईच्या बाबतीतही असेच काहीतरी सुरू आहे. शहरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच होत आहे. प्रथम मुंबई आणि नंतर संपूर्ण एमएमआर प्रदेश ताब्यात घेऊन गुजरातमध्ये विलीन केला जाईल. मराठी लोकांनी जागे व्हावे.” असे म्हणत त्यांनी संतप्त भूमिका मंडळी होती. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाव बदलण्याच्या भूमिकेमुळे या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या व्यक्तव्याने खरंच आयआयटी बॉम्बे ही नाव बदलून आयआयटी मुंबई होणार का? केंद्र सरकारचा या वर काय निर्णय असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!