Times of Maharashtra Desk, Kanav Vasant Chavan Prabhag 22 Pune: पुण्यातील प्रभाग क्रमांक २२, काशेवाडी डायस प्लॉट येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारीचा अर्ज कणव वसंत चव्हाण यांनी पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात सादर केला. शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते हा अर्ज स्वीकृत करण्यात आला.
अर्ज दाखल करताना कणव वसंत चव्हाण यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, आवश्यक विकासकामे, पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि सर्वसमावेशक प्रगती यांना प्राधान्य देत जबाबदारीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रभाग २२ च्या सातत्यपूर्ण आणि नियोजित विकासासाठी स्वतःची बांधिलकी अधोरेखित करत त्यांनी नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचा निर्धारही व्यक्त केला.
कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उत्साहाने उपस्थित होते. प्रभागातील विकासासाठी पक्षावर असलेला नागरिकांचा विश्वास आणि कणव वसंत चव्हाण यांच्या कार्यक्षम प्रतिमेमुळे या उमेदवारी अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
“लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहणे, आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे ही माझी प्रामाणिक भूमिका राहील,” असे मत कणव वसंत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
कणव चव्हाण हे माजी मंत्री वसंत चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी मोफत नागरी सुविधा शिबीर, आधार कार्ड शिबिर, मोफत ड्रायव्हिंग लायसन्स शिबिर, क्रिकेटपटूंसाठी गोळीबार चषक, नंबर प्लेट रजिस्ट्रेशन शिबीर, शारदीय नवरात्रोत्सव, धार्मिक कार्ये तसेच संपूर्ण पुणे शहरात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप असे अनेक कार्य सातत्याने सुरू असतात त्यांनी केलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि युवकांची त्यांना साथ असल्याचे दिसून येते.






















