Homeदेश-विदेशKarnatak: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा शिगेला; डी.के. शिवकुमार यांची सूचक पोस्ट...

Karnatak: कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा शिगेला; डी.के. शिवकुमार यांची सूचक पोस्ट…

Times of Maharashtra Desk, Pune: कर्नाटकात सध्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी मोठा जोर धरला आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने सक्रिय भूमिका घेण्याचे संकेत दिले असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांचे सूचक विधान

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या प्रश्नावर भाष्य करताना स्पष्ट केले की, हा निर्णय घाईने घेतला जाणार नाही. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकत्रितपणे बसून चर्चा करू, जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही औषध देऊ.” पक्षश्रेष्ठी सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि योग्य वेळी हस्तक्षेप करून तोडगा काढला जाईल. असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्यातरी कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

डी.के. शिवकुमार यांची पोस्ट

एकीकडे दिल्लीत बैठकींचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एका जुन्या व्हिडिओसोबत लिहिले आहे की “दिलेला शब्द पाळणे हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे.”

राजकीय विश्लेषकांच्या मते, शिवकुमार यांची ही पोस्ट म्हणजे काँग्रेस हायकमांडला अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापनेच्या वेळी झालेल्या कथित अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे. शिवकुमार यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, आता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची वेळ आली आहे.

दिल्लीत खलबते आणि सिद्धरामय्यांची रणनीती
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने कर्नाटकातील दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पद सोडण्यास सहजासहजी तयार नाहीत. जातीय जनगणनेचा मुद्दा आणि राज्यातील त्यांची लोकप्रियता वापरून ते आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर पक्षाने डी.के. शिवकुमार यांना बढती देण्याचा निर्णय घेतला, तर सिद्धरामय्या यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

मे २०२३ मध्ये कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तेव्हा सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस होती. त्यावेळी तडजोड म्हणून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री केले गेले. त्यावेळी असा अलिखित करार झाल्याचे बोलले जाते की, पहिली अडीच वर्षे सिद्धरामय्या आणि उरलेली अडीच वर्षे शिवकुमार मुख्यमंत्री असतील. आता सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आल्याने शिवकुमार यांच्या गोटातून नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत आहे.

सध्या चेंडू काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे खरगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार की सिद्धरामय्याच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!