अपीलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; ‘वही-पेन्सिल’चा खेळ मांडून भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा सुरस प्रयत्न!
पुणे :- महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे संशोधन कार्यालयात नक्की काय शिजतंय? विविध योजनांचा निधी, कामांचा हिशोब आणि रोखलेखाच्या प्रती मागितल्या तर जन माहिती अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती स्नेहा राऊत यांना एवढा पोटशूळ का उठावा? माहिती अधिकार कायद्यांतर्गत पारदर्शक कारभार दाखवण्याऐवजी माहिती लपवण्यासाठी जी धडपड सुरू आहे, त्यावरून वन विभागातील ‘मोठ्या आर्थिक घोटाळ्याची’ वास आता सर्वदूर पसरू लागली आहे!
‘अवलोकना’ची नौटंकी कशासाठी?
प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात आदेश दिला होता – “अर्जदारास १० दिवसांच्या आत सर्व माहिती विनामूल्य पुरवा!” पण मॅडमना बहुधा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य चालवण्यात जास्त रस दिसतोय. आदेशाचे पालन करून माहितीच्या सत्यप्रती हातात टेकवण्याऐवजी मॅडमनी अर्जदाराला थेट ‘वही आणि पेन्सिल घेऊन अवलोकनाला या’ असा फर्मान सोडला!
> “अहो मॅडम, आम्ही माहितीचा अधिकार वापरून कायदेशीर माहिती मागितलीये, अभ्यासासाठी शाळेचा गृहपाठ नाही! वही-पेन्सिल घेऊन यायला वन विभाग काय बालवाडी आहे का? की कागदपत्रांवरच्या घोटाळ्याच्या सह्या लपवण्यासाठी पेन्सिलने खाडाखोड करायची बुद्धी सुचलीये?”
>
माहिती लपवण्यामागे ‘अर्थ’कारण काय?
जी माहिती माहिती अधिकार अर्जदार यांनी मागितली होती ती माहिती देण्याकरिता तसेच सार्वजनिक करायला मॅडम एवढ्या घाबरतात का?
जर कारभारात पारदर्शकता असेल, तर माहिती द्यायला हात का थरथरत आहेत?
जर घोटाळा झाला नसेल, तर मग प्रमाणित सत्यप्रती देण्याऐवजी केवळ ‘बघा आणि जा’ असा पवित्रा का घेतला जातोय?
अपीलीय अधिकाऱ्यांचा आदेश मोडून स्वतःचाच नवा कायदा चालवण्याचे धैर्य कुठून येते?
या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर समोर येत आहे – पुणे वन संशोधन विभागात लाखो रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे! आणि तो घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणूनच माहिती देण्याऐवजी अर्जदाराला फेऱ्या मारायला लावल्या जात आहेत.
आता प्रकरण अंगाशी येणार!
वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करणे आणि माहिती अधिकाराची थट्टा उडवणे स्नेहा राऊत यांना भलतेच महाग पडणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून माहिती दाबण्याचा हा प्रयत्न आता त्यांच्यावरच उलटला असून, या संपूर्ण प्रकरणाची शेक थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचली आहे. माहिती लपवून घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न राज्य माहिती आयुक्तांपर्यंत पोहोचणार असून, आता वही-पेन्सिलचा खेळ सोडून राऊत मॅडमला ‘कायद्याचा खाक्या’ सहन करावा लागणार, हे मात्र नक्की!
भाग 1
क्रमश:
भाग दोन लवकरच
लवकरच भाग 2 मध्ये या कार्यालयातील सर्व भोंगळ कारभार करणार टाइम्स ऑफ महाराष्ट्र उघड…






















