Homeताज्या बातम्यामेडी पॉइंट रुग्णालयाजवळ वारंवार कोंडी; नागरस रस्ता, औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने...

मेडी पॉइंट रुग्णालयाजवळ वारंवार कोंडी; नागरस रस्ता, औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने समस्या…

पुणे (औंध) – औंध येथील मेडी पॉइंट हॉस्पिटलजवळ दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरस रस्ता, डीपी रस्ता आणि औंध-बाणेर लिंक रस्ता हे तीन महत्त्वाचे रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे येथे दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या भागात वाहनचालकांचे बेशिस्त वर्तन, नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. चतुःशृंगी वाहतूक विभागाने काही वेळा उपाययोजना केल्या असल्या तरी त्या सातत्याने न राबवल्यामुळे कोंडीचा प्रश्न कायम आहे.

मेडी पॉइंट चौक ते कै. यशवंतराव भाले चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा परिणाम नोकरदार वर्ग, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. औंध-बाणेर लिंक रोड आणि डीपी रोड यांवरही याचा थेट परिणाम दिसून येतो.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले की, या वाहतूक कोंडीमुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली असून आर्थिक नुकसान होत आहे. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे अवघड झाले आहे.

समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, कुमार प्रेरणा सोसायटीसमोरील पदपथ कमी करून बाणेरकडून येणारी वाहतूक विनाअडथळा पुढे जाऊ देणे, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेटिंगचा वापर करणे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिका व वाहतूक विभागाकडे तत्काळ आणि ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून हा रोजचा त्रास संपेल आणि जनजीवन सुरळीत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!