Times of Maharashtra desk: रशिया देश हा तेलाचा व्यापारी आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील व्यापारी संबंध बरेच जुने असले तरी इतर देशांपेक्षा रशिया भारताला स्वस्तात तेल देते. म्हणूनच भारत इतकी वर्ष रशिया कडून तेल खरेदी करत आहे. परंतु अमेरिकेने प्रतिबंध केल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले असून भारत दुसऱ्या तेल विक्रेत्या देशाच्या शोधात आहे. पण आता भारतावर मोठे संकट आल्याचे दिसून येते. OPEC+ देशांनी घेतलेल्या निर्णयाने भारत चांगलाच धोक्यात आला आहे. OPEC+ देशांनी एकूण दोन निर्णय घेतले आहेत.
ते दोन निर्णय कोणते ?
रविवारी ओपेक प्लस देशांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्ट नुसार या बैठकीत पुढील पप्रमाणे
दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
१) डिसेंबर 2025 पासून रोज 1.37 लाख बॅरेलने तेल उत्पादनात वाढ करण्यात येईल.
२) 2026 सालाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तेल निर्मिती वाढवणे पूर्णपणे थांबवण्यात येईल. म्हणजेच या काळात तेल उत्पादनात कोणतीही वाढ होणार नाही. या काळात बाजारावर बारीक लक्ष ठेवले जाईल.
या निर्णयाने भारत आता चिंतेत पडला आहे.
भारताला नेमका धोका काय?
OPEC+ मध्ये एकूण 22 प्रमुख तेल उत्पादक देश समाविष्ट आहेत. या 22 देशांनी मिळून घेतलेल्या निर्णयामुळे तेलाच्या किमतींवर बराच फरक पडणार आहे. ओपेक प्लस गटाच्या निर्णयानुसार तेल उत्पादन सीमित असेल तर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाची किंमत वाढू शकते. भारत आवश्यकतेच्या तुलनेत 85 टक्के तेलाची आयात करतो. ओपेक प्लस गटाच्या या निर्णयामुळे भारताचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात तेल महाग होऊ शकते.
अमेरिकेने रशियातील दोन तेल निर्मिती कंपन्यांना प्रतिबंध केल्यामुळे
भारत सौदी अरेबिया, इराक, यूएई यासाख्या देशांकडे कच्चे तेल मागण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यामध्ये OPEC+ देशांनी मिळून घेतलेल्या निर्णयामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल चे भाव वाढण्याची शक्यता आहे.






















