परभणी (जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील वीरशैव समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीचे आयोजन दि. १९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, भव्य शोभायात्रा, मिरवणूक, रक्तदान शिबिर तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे.
या जयंतीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी अॅड. प्रसाद शेटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कापसे, सचिव अतुल स्वामी, कार्याध्यक्ष राजेश दामा व विश्वंभर जाडे, कोषाध्यक्ष राजेश गौरकर, सहसचिव बाजीराव शेटे यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून चंद्रशेखर अष्टेकर, राज खाकरे, परमेश्वर अनसापुरे, तर मार्गदर्शक म्हणून बालाजी शेटे, संजय धुळे, सुशील वाडेवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संयोजक म्हणून रावण भालेराव, जगदीश मदोडे, दीपक फुटके, संदीप वाडेवाले यांची तर कार्यवाहक म्हणून मंगेश मदोडे, चिंतामणी घेवारे, गजानन मदोडे यांची निवड करण्यात आली आहे.
दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. पुढे निळकंठेश्वर मंदिर (सरस्वती विद्यालय मैदान) येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, भगवती चौक, राजेंद्र पेठ गल्ली मार्गे नगरेश्वर मंगल कार्यालय येथे भव्य मिरवणुकीची सांगता होईल.
सायंकाळी ७ वाजता प.पू. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा) यांचे आशीर्वचन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सार्वजनिक बसवेश्वर जयंती उत्सवात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.






















