Homeताज्या बातम्यामराठी नाट्य सृष्टीतील हिरा हरपला जेष्ठ नाटकर गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या ८६...

मराठी नाट्य सृष्टीतील हिरा हरपला जेष्ठ नाटकर गंगाराम गवाणकर यांनी वयाच्या ८६ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Times of Maharastra Desk, Gangaram Gawankar Passes Away :  दोघी , वस्त्रहरण , वरपरीक्षा, वर भेटू नका, वन रूम किचन या नाटकातून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करणारे नाटकर गंगाराम गवाणकर यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या नाटकांनी एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून ते आजाराशी झुंज देत होते,आखेर काल रात्री त्यांची आजाराशी झुंज आपयाशी ठरली आणि दहिसर मधील रुग्णालयात त्यांची प्राण जोत मावळली.

गवाणकर यांचे वस्त्रहरण ह्या नाटकाने मराठी नाटक रंगभूमि चांगलीच गाजवली. मालवणी भाषेला ऊंची गाठून देण्यात गवाणकरांचे मोठे योगदान आहे. त्याच बरोबर त्यांनी मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणले. ग्रामीण माणसाचा विनोद, त्याची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झाळकायची. त्यांनी ‘जगर’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तर ‘वात्रट मेळा’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ यांसारखी २० हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. मात्र ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या नाटकांचा नवा अध्याय लिहून ठेवला.गवाणकर यांनी अनेक नाटके व पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. सुरुवातीच्या काळात एमटीएनएलमध्ये नोकरी करत त्यांनी आपला नाट्य लेखनाचा छंद सुद्धा जोपासला. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवर आपली वाटचाल सुरु केली.आणि मग एका पेक्षा एक अशी नाटके त्यांनी रंगभूमीला दिली.९६व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते. असा ज्येष्ठ नाटककार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज दहिसर येथील आंबावाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जण्याने मराठी नाटक सृष्टीत शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजलि देण्यात आली तेंव्हा ते ,

“म्हणाले मालवणीचा गोडवा, ठसका जगभर पोहोचविणाऱ्या प्रतिभावंताला मुकलो..”

मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभर पोहोचविणारा, कोकणातील बहुमुखी प्रतिभावंत अशा साहित्यिक, नाटककाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत यांनी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘वस्त्रहरण या विक्रमी नाटकासह,इतर नाट्यकृतींच्या माध्यमातून मराठी रंगभूमीसाठीचे स्वर्गीय गवाणकर यांचे योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

error: Content is protected !!