Homeताज्या बातम्यागेवराईत २५१ रक्तदात्यांकडून अजितदादांना आदरांजली आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून जनसेवा...

गेवराईत २५१ रक्तदात्यांकडून अजितदादांना आदरांजली आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून जनसेवा सप्ताहचे आयोजन

गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.२२ (प्रतिनिधी) ः- स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून जनसेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले. बुधवार, दि.२२ जुलै रोजी रक्तदान शिबीरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहीली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इतर संस्थांनी यावेळी स्व. अजितदादांना विनम्र अभिवादन केले. अतिशय भावपूर्ण वातावरणात स्व. अजितदादांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला. पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित याच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून जनसेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले. विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. बुधवार, दि.२२ जुलै रोजी शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहीली. रक्तदान शिबीराचे उद्घाटन बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भिमकन्या प्रेमलताताई पारवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने डॉ.धनश्री पंडित यांनी त्यांचे स्वागत केले. रक्तदान शिबीरात युवा नेतृत्व पृथ्वीराज पंडित व रणवीर पंडित रक्तदान करून स्व.अजितदादांना आदरांजली अर्पण केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार यांनी प्रथम रक्तदान केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

जनसेवा सप्ताहमध्ये गुरुवार, दि.२३ जुलै रोजी सकाळी १० वाजता गोदावरी सभागृह र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे दिव्यांगांना अनुदान मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, शुभम पवार, तहसिलदार संजय सोनवणे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.२४ जुलै रोजी सकाळी १० वाजता गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे रेशीम शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यशाळेत रेशीम संशोधन केंद्र, परभणीचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे मार्गदर्शन करणार असून सरपंच तथा रेशीमरत्न शेतकरी कालिदास नवले आणि तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.२४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुप्रसिध्द व्याख्याते तथा लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार, दि.२६ जुलै रोजी शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीरात अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून निर्मित अत्यंत हलके व मजबुत कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप होणार आहे.

रक्तदान शिबीरस्थळी आ. विजयसिंह पंडित, शिवशारदा मल्टिस्टेटचे संस्थापक जयसिंग पंडित, शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख खाजा, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, जय भवानीचे संचालक श्रीराम आरगडे, शांतीलाल पिसाळ, अक्षय पवार, संदिप मडके, विजय सुतार, दत्ता दाभाडे, बाबुराव राऊत, दिलीप गंगवाल, गोरखनाथ शिंदे, इमरान अन्सारी, गणेश वडगणे, मोहसीन शेख, राहुल मोटे, अविनाश मोटे, किरण दाभाडे, अमोल वैद्य, राहुल मस्के, दादासाहेब घोडके, विनोद सौंदरमल, सचिन मोटे, उत्तम सोलाने, जालिंदर पिसाळ, समाधान मस्के, विजय जोंधळे, वसीम फारोकी, दिनेश घोडके, नवीद मशासक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दादाप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*चौकट*
*महिला रक्तदात्यांचा लक्षणीय सहभाग*

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात महिला रक्तदात्यांचा सहभाग लक्षणीय ठरला. गेवराईसह ग्रामीण भागातील महिला भगिनी आणि विद्यार्थीनींनी रक्तदान शिबीरात रक्तदान करून स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहीली. पहिल्यांदाच महिलांचा रक्तदान शिबीरातील सहभाग उपस्थितांना भावला. आ. विजयसिंह पंडित यांनी रक्तदात्या विद्यार्थीनींचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!