Homeताज्या बातम्यापुण्यात जीएसटीची रेड! १,१९६ कोटींचा मोठा घोटाळा उघडकीस, तपासात २० बनावट कंपन्याचा...

पुण्यात जीएसटीची रेड! १,१९६ कोटींचा मोठा घोटाळा उघडकीस, तपासात २० बनावट कंपन्याचा समावेश ; आणखीन धागेदोरे असण्याची शक्यता

पुणे : जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय)च्या पुणे विभागीय शाखेने 1,196 कोटी रुपयांचा मोठा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पुणे, दिल्ली, नोएडा आणि मुझफ्फरनगरमधील विविध ठिकाणी छापे टाकून केलेल्या तपासात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बोगस कंपन्यांचे एक अत्याधुनिक नेटवर्क आता समोर आले  आहे.

अटक केलेली व्यक्ती मुझफ्फरनगरमधील एका खाजगी कंपनीची संचालक असून या ऑपरेशनमागील सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात आढळून आले आहे की, त्यांच्या ग्रुपने पत्ते, ओळखपत्रे, ईमेल आयडी आणि फोन नंबरचा डेटाबेस ठेवला होता आणि नवीन जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी आणि शोध टाळण्यासाठी शिताफीने तो वापरला जात होता. नव्याने स्थापन कंपन्यांवर याच ग्रुपमधून संचालक किंवा मालक निवडले गेले होते, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना बेकायदेशीर व्यवहार चालू ठेवता आले.

व्यापाराचे अस्सल चित्र उभे करण्यासाठी आरोपींनी कोणतेही कायदेशीर व्यवसाय नसलेल्या बनावट कंपन्या स्थापन केल्या होत्या. बनावट इनव्हॉइस आणि ई-वे बिल तयार केले होते. आणि या ई-वे बिलांवर RFID चा कुठलाही उल्लेख नव्हता. त्यामुळे मालाचा प्रत्यक्ष पुरवठा झाला नसल्याचे सिद्ध झाले. या बनावट टोळीने 1,196 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी मिळवले आणि दुसऱ्याना देखील दिले.

अधिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी जीएसटी नोंदणीच्या कायदेशीर परिणामांची माहिती नसलेल्या आणि संशय येणार नाही अशा  कर्मचाऱ्यांच्या जे  प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील होते. त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला.आयटीसी घोटाळा सुलभ करण्यासाठी या बनावट कंपन्या आपापसात पुरवठादार आणि प्राप्तकर्ता म्हणून काम करत होत्या. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या कंपन्यांची नोंदणी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या म्हणून करण्यात आली होती. कर दायित्व पार पाडण्यासाठी बनावट पुरवठ्यांमधील आयटीसीचा वापर केला जायचा आणि लाभार्थ्यांना आयटीसी हस्तांतरित केला जायचा.

अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांना मूळ पावत्या, आर्थिक नोंदी, कंपनीचे स्टॅम्प्स आणि सील सापडले. तपासात आतापर्यंत अशा 20 बनावट  कंपन्या आढळल्या आहेत. ज्यांचा  कोणताही खरा व्यवसाय नाही. अधिकाऱ्यांनी बनावट कंपन्यांशी संलग्न एक बँक खाते देखील गोठवले असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!