Homeआरोग्यउन्हाचा तडाखा वाढला; डिहायड्रेशनपासून स्वतःचे रक्षण करा -डॉ. शशिकांत मुळे यांचा इशारा

उन्हाचा तडाखा वाढला; डिहायड्रेशनपासून स्वतःचे रक्षण करा -डॉ. शशिकांत मुळे यांचा इशारा

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जनरल फिजिशियन डॉ. शशिकांत मुळे यांनी डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारप्रवण व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मुळे यांनी सांगितले की, दुपारी ११ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. आवश्यक असल्यास सावलीचा आधार घ्यावा आणि डोक्यावर टोपी किंवा कापड वापरून उन्हापासून संरक्षण करावे. तसेच, दुपारच्या वेळेत शारीरिक कष्टाची कामे टाळणेही गरजेचे आहे.

डिहायड्रेशनची लक्षणे ओळखा
अत्याधिक तहान लागणे, त्वचा कोरडी किंवा दमट वाटणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, थकवा, डोकेदुखी आणि मळमळ ही डिहायड्रेशनची प्रमुख लक्षणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आहारात बदल आवश्यक
उन्हाळ्यात हलका, ताजा आणि पौष्टिक आहार घ्यावा. भाज्या, कडधान्ये आणि घरगुती पदार्थांचा समावेश करावा. तेलकट, तिखट आणि जंक फूड टाळल्यास शरीरातील उष्णता कमी राहण्यास मदत होते.

पाणी प्या, हायड्रेट राहा
दर १ ते २ तासांनी पाणी पिणे अत्यावश्यक आहे. कोल्ड ड्रिंक्सऐवजी स्वच्छ पाणी, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेयांचा वापर करावा. घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने सातत्याने पाणी पिणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

रसदार फळांचा आहारात समावेश करा
टरबूज, संत्रा यांसारखी रसाळ फळे शरीराला थंड ठेवतात आणि नैसर्गिक ऊर्जा देतात. उन्हाळ्यात अशा फळांचे सेवन फायदेशीर ठरते.

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य काळजी घेतल्यास डिहायड्रेशन आणि उष्माघातापासून बचाव होऊ शकतो, असे डॉ. शशिकांत मुळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!