Homeताज्या बातम्यापतीने केला पत्नीचा गळा आवळून खून पुण्यातील घटना

पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून पुण्यातील घटना

पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून पुण्यातील घटना…

पुणे : पत्नीवर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी पती घराला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी साडेसातच्या आधी जनवाडी जनता वसाहत येथील लाडाचा गणपती मंदिराजवळ घडला.

याप्रकरणी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

रेश्मा चंदर पंतेकर (३०, रा. जनवाडी जनता वसाहत) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर चंदर अशोक पंतेकर (३३) याच्यावर खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेश्मा यांचा भाऊ राहुल राजू मंजाळकर (२४, रा. सुतारवाडी बस डेपो जवळ, पाषाण) यांनी गुरुवारी (दि. २५) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोस्टमार्टम अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांची बहीण रेश्मा पंतेकर हिचा पती चंदर याने तिच्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून त्याची दुचाकी घेऊन पळून गेला. याबाबत माहिती मिळताच राहुल याने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत चंदर विरोधात तक्रार दिली. दरम्यान, मयत रेश्मा हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला.

अहवालातून रेश्मा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती चंदर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!