Times of Maharashtra Desk :काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका या देशातील ताण वाढत चालला होता. टॅरिफच्या मुद्यामध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध जरा बिघडले आहेत तरी देखील भारताने आपली मैत्री कायम ठेवत अमेरिकेची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आता अमेरिकेच्या मदतीला धावून गेल्याचे बघायला मिळतंय. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार समंध जणू बंदच पडले होते. मात्र आता चित्र काही वेगळेच दिसत आहे. दोन्ही देशांतील ताण कमी होताना दिसत आहे. व्यापार करार देखील अंतिम टप्प्यात आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे. भारताने या वर्षी पहिल्यांदाच अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला जेट इंधन निर्यात केले आहे. ही शिपमेंट ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेवरॉनसाठी असून लॉस एंजेलिसमधील इंधनाची कमतरता भरून काढण्यासाठी ही आयात करण्यात आली अशी माहिती मिळाली आहे.
कॅलिफोर्नियातील शेवरॉन रिफायनरीला आग लागली त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून अमिरिकेच्या पश्चिम किनारीवरील जेट इंधनाचे उत्पादन कमी झाले होते. ज्यामुळे कंपनीला अनेक युनिट्स बंद करावे लागले. ही नुकसान भरून काढण्यासाठी इंधनाची अवशक्यता होती. नाही तर अमेरिकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आसते म्हणून भारतातून इंधन आयात करण्यात आले. हाफनिया कल्लांग नावाच्या टँकरवर अंदाजे 60,000 मेट्रिक टन जेट इंधन भरण्यात आले. हे जहाज 29 ऑक्टोबर दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरी येथून निघाले असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे जहाज लॉस एंजेलिसमध्ये पोहोचेल अशी माहिती मिळाली आहे. शेवरॉन रिफायनचे काम २०२६ परीनात पूर्ण होईल असा आंदज आहे तोपर्यन्त अमिरिकेच्या पश्चिम किनारीवरील जेट इंधनाची कमतरता भासू नये म्हणून अमेरिकेने भरता कडून ही तेल विकत घेतले आहे. यासाठी भारताच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत मोठा करार केला आहे. हा करार एलपीजी आयातीबद्दलचा आहे. त्यामुळे 2026 पासून अमेरिका भारतात एलपीजी आयात करेल






















