Homeताज्या बातम्याआयटी प्रोफेशनल ते Mrs. Timeless Beauty 2025: उषा जोशी यांची गगनभरारी, स्वप्नांना...

आयटी प्रोफेशनल ते Mrs. Timeless Beauty 2025: उषा जोशी यांची गगनभरारी, स्वप्नांना मिळालेलं सोनेरी स्पर्श…

आयटी प्रोफेशनल ते Mrs. Timeless Beauty 2025: उषा जोशी यांची गगनभरारी, स्वप्नांना मिळालेलं सोनेरी स्पर्श…

पुणे – एखादं स्वप्न साकार करणं म्हणजे केवळ स्पर्धेत जिंकणं नाही, तर स्वतःला पुन्हा शोधणं असतं. हेच उषा जोशी यांनी सिद्ध करून दाखवलं. आयटी क्षेत्रातील गगनभरारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आईपण आणि स्वतःच्या छंदांची गुंफण – सगळ्याचा समतोल साधत त्यांनी Mrs. Timeless Beauty 2025 या प्रतिष्ठित किताबावर उषा जोशी (Usha Joshi Mrs. Timeless Beauty 2025) यांनी आपलं नाव कोरलं.

तुम्ही TCS मध्ये १८ वर्षं प्रोग्राम मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम केलं असाल, दोन मुलींच्या आई असाल, वृद्ध सासू-सासऱ्यांची आणि स्वतःच्या आईवडिलांची काळजी घेत असाल – तरीही एखाद्या स्पर्धेसाठी स्वतःला पुन्हा तयार करणं, हे खरोखर धैर्याचं काम आहे.

उषा या त्यांच्या साध्या हसऱ्या चेहऱ्याने सांगतात,

“जेव्हा आपण प्रत्येकासाठी सर्व काही देतो, तेव्हा आपण स्वतःला कुठेतरी हरवतो. मला हा आवाज पुन्हा ऐकायचा होता – स्वतःचा आवाज.”

यासाठी त्यांनी केवळ वेळ नव्हे तर मनाची तयारी, अपार चिकाटी आणि धीर एकवटला. ऑफिसमधील ताण, घरातील जबाबदाऱ्या आणि स्वतःचे शारीरिक-मानसिक थकवा यांच्याशी झगडत त्यांनी रात्रीच्या वेळी रॅम्प वॉकची प्रॅक्टिस केली, पोझ देणं शिकलं, स्वतःवर प्रचंड मेहनत घेतली.

संध्याकाळी जेवणं उरकून, मुलींना गृहपाठ करून देऊन, सासूबाईंना औषधं देऊन मग तासन्‌तास आरशासमोर उभं राहून उषा स्वतःला पुन्हा घडवत होत्या. हा प्रवास तितकाच भावनिकही होता.

“कधी कधी मला शंका यायची – का हे सगळं करत आहे? पण मग माझ्या मुलींचे डोळे आठवायचे. त्यांना दाखवायचं होतं की आई काहीही करू शकते,” त्या सांगतात.

अश्रू, थकवा, आत्मशंका – या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यावरच यश मिळतं हे उषांनी आपल्या प्रवासातून दाखवून दिलं.

या स्पर्धेत फक्त सौंदर्य नव्हतं, तर व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि करुणाही महत्त्वाची होती. हयात हॉटेल, पुणे येथील अंतिम फेरीत, आपल्या प्रगल्भ विचारांनी आणि नजरेतील आत्मविश्वासाने उषांनी परीक्षकांची मनं जिंकली आणि Mrs. Timeless Beauty 2025 हा सन्मान त्यांच्या नावावर केला.

“हा मुकुट फक्त माझा नाही,” त्या अभिमानाने म्हणतात,

“हा माझ्या मुलींचा आहे – ज्यांनी मला बिनधास्त प्रोत्साहन दिलं; माझ्या नवऱ्याचा – ज्यांनी माझ्या अनुपस्थितीत घर सांभाळलं; माझ्या सासर-माहेरच्या सगळ्यांचा – ज्यांनी मला एकही दिवस दोष दिला नाही; आणि माझ्या सहकाऱ्यांचा – ज्यांनी कायम विश्वास ठेवलाय.”

ही कहाणी प्रत्येक स्त्रीसाठी एक संदेश आहे – स्वप्न साकार करायला वयाचं, जबाबदाऱ्यांचं किंवा वेळेचं बंधन नसतं.

आज उषा जोशी एक स्पर्धा जिंकून थांबणार नाहीत. त्या आता महिलांसाठी सेल्फ डेव्हलपमेंट वर्कशॉप घेण्याचं स्वप्न बाळगतात. आपल्या अनुभवातून त्यांनी हे सिद्ध केलंय की तुमच्या आवडीच्या गोष्टी करताना तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणखी समृद्ध होता.

“स्वतःला शोधा, स्वतःवर प्रेम करा आणि मनापासून प्रयत्न करा,” असं त्या प्रत्येकाला सांगतात.

आज उषा जोशी या फक्त Mrs. Timeless Beauty 2025 नाहीत – त्या त्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व करतात जिचं स्वप्न तिनं कुठेतरी कपाटाच्या खणात बंद करून ठेवलं होतं.

कारण, खरंच – स्वप्न पूर्ण करण्यास कधीच उशीर नसतो.

अधिक माहिती साठी उषा जोशी यांची इन्स्टाग्रामवर visit करा.

https://www.instagram.com/ushajoshihere?igsh=ZWF1MGFwNGdxc2dk

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!