Homeआरोग्य५०० रुपयांच्या वादातून तरुणाची हत्या; जळगाव हादरले

५०० रुपयांच्या वादातून तरुणाची हत्या; जळगाव हादरले

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार ) : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५ वर्षे) असे आहे. काही दिवसांपूर्वी नितीन काळे यांनी संशयित तूकाराम सूर्यवंशी याला जेवणासाठी पैसे उधार दिले होते. त्यानंतर सूर्यवंशी यांनी नितीनकडे ५०० रुपये मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात संशयिताने धारदार शस्त्राने नितीन काळे यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले होते. जखम इतकी गंभीर होती की त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी तूकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ ५०० रुपयांच्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जैनाबाद परिसरात धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५ वर्षे) असे आहे. काही दिवसांपूर्वी नितीन काळे यांनी संशयित तूकाराम सूर्यवंशी याला जेवणासाठी पैसे उधार दिले होते. त्यानंतर सूर्यवंशी यांनी नितीनकडे ५०० रुपये मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात संशयिताने धारदार शस्त्राने नितीन काळे यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले होते. जखम इतकी गंभीर होती की त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी तूकाराम सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, नितीन काळे यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!