Homeक्राईमदौंड येथे गोवंश हत्या प्रकरणात तीन सराईत आरोपींना तडीपार

दौंड येथे गोवंश हत्या प्रकरणात तीन सराईत आरोपींना तडीपार

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयूर साळवे) : दौंड पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश हत्या व संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन सराईत आरोपींवर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये टोळी प्रमुख लड्डू उर्फ हसन हाश्मी कुरेशी (वय २२) याच्यासह जमिल इस्माईल कुरेशी (वय ४५) आणि फैजान अब्दुल कुरेशी (वय ३८), सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड यांचा समावेश आहे. या तिघांवर गोवंश जातीच्या गायींची बेकायदेशीर कत्तल करणे तसेच कत्तलीच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते.

आरोपींच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. तसेच दौंड शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत तडीपार प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर सुनावणी घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी संबंधित तिन्ही आरोपींना पुढील दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, हवेली, इंदापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!