Homeताज्या बातम्यापुण्यातील कडनगर चौकात बेवारस वाहनांवर वाहतूक विभागाची आणि महापालिकेची संयुक्त धडाकेबाज कारवाई...

पुण्यातील कडनगर चौकात बेवारस वाहनांवर वाहतूक विभागाची आणि महापालिकेची संयुक्त धडाकेबाज कारवाई ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ; नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार…

पुण्यातील कडनगर चौकात बेवारस वाहनांवर वाहतूक विभागाची आणि पुणे महापालिकेची संयुक्ताने धडाकेबाज कारवाई ; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास ; नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार…

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागाने केलेल्या योजनाबद्ध कारवाईअंतर्गत, कडनगर चौक परिसरात बरेच दिवसांपासून रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांना सात दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. नोटीसीची मुदत संपल्यानंतर वाहतूक विभागाने महापालिकेच्या मदतीने ही वाहने रस्त्यावरून हटवली.

काळेपडळ वाहतूक विभाग अंतर्गत येणाऱ्या कडनगर चौक परिसरात काही वाहनधारकांनी आपली वाहने अनेक दिवसांपासून रस्त्यावर बेवारस स्थितीत उभी ठेवली होती. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता आणि परिसरातील नागरिकांचीही गैरसोय होत होती. अनेकदा स्थानिक रहिवाशांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले.

या कारवाईसंदर्भात माहिती देताना काळेपडळ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, “सार्वजनिक रस्त्यांवर अनेक दिवस बेवारस अवस्थेत असलेली वाहने ही केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तींसाठी आश्रयस्थळ ठरू शकतात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.”

सदर कारवाई महापालिकेच्या सहाय्याने करण्यात आली असून, नोटीस लावल्यानंतर वाहनधारकांनी स्वतःहून वाहने न हलविल्यामुळे त्यांची वाहने उचलून वाहतूक विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या सोबत वाहतूक विभागातील पोलिस हवालदार आप्पाराव कोळी, संग्राम पाटील, राहुल लेकावळे आणि पोलिस शिपाई अतुल शिरसाट यांनी कार्यवाहीमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक विभागाच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. “अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे व्हाव्यात, जेणेकरून सार्वजनिक जागांचा अयोग्य वापर रोखता येईल आणि वाहतुकीला गती मिळेल,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

पुढील काळात देखील अशा प्रकारच्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या वाहनांचा रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!