Homeताज्या बातम्या१६ हजार ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; सरपंचांना प्रशासकपद द्यावे – अखिल भारतीय सरपंच...

१६ हजार ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; सरपंचांना प्रशासकपद द्यावे – अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा

Times Of Maharashtra Desk : राज्यातील १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आल्याने त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र, इतर राज्यांच्या धर्तीवर सरपंच व विद्यमान लोकप्रतिनिधींनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील ग्रामपंचायती शुक्रवार, दि. २० रोजी बंद ठेवण्याची घोषणा अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केली आहे.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या तुलनेत शासकीय कोट्यातील मनुष्यबळ अत्यंत अपुरे आहे. परिणामी एका प्रशासकाकडे पाच ते २० पेक्षा अधिक गावांचा कारभार सोपवावा लागत आहे. एवढ्या मोठ्या कार्यभारामुळे गावांच्या विकासकामांवर परिणाम होत असून नागरिकांना योग्य न्याय मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर लोकप्रतिनिधींची सक्रिय भूमिका आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरपंचानाच प्रशासक नियुक्त करावे.

प्रशासक म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यामागे कायदा व न्यायालयीन आदेशांचा आधार घेतला जातो. मात्र मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केल्याचे उदाहरण असल्याचा दावा परिषदेकडून करण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारने राज्यपालांमार्फत अध्यादेश काढून किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा करून सरपंच व विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

थकबाकी तातडीने जमा करावी 

दरम्यान, रोजगार हमी योजनेंतर्गत पाणंद रस्ते, ९५/५ ई विकासकामे, गायगोठे, विहिरी यांसारख्या वैयक्तिक योजनांची थकीत रक्कम अद्याप लाभार्थींना मिळालेली नाही. तसेच स्वच्छ भारत मिशन, अभिसरण आणि ठक्कर बाप्पा योजना यांसारख्या योजनांची देयकेही प्रलंबित असल्याचे सांगत सर्व थकीत रकमा तातडीने अदा कराव्यात, अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे.

याइतरही मागण्यांचा विचार व्हावा

या शिवाय सरपंच व उपसरपंचांचे वाढीव मानधन नियमित देणे, विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार, ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी, विमा संरक्षण व निवृत्तीवेतन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा परिषदेकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिका की वारुळे साहेबांची जहागिरी? बदल्यांच्या खेळात ‘आर्थिक हितसंबंधांचा’ वास; संतोष वारुळे यांचा...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुणे महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा एक अजब आणि संशयास्पद खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त...

जामनेर आगारातून नवीन एसटी बस चोरीला; १२ किलोमीटरवर शहापूरजवळ सापडली

0
जामनेर:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर एसटी आगाराच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सोमवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. आगाराच्या आवारात उभी असलेली नवीन...

“पुणे तिथे काय उणे? गगनबावड्याच्या बदलीवर ‘सेटिंग’चे ग्रहण; चार महिने उलटूनही अधिकारी पुण्यातच! मंगेश...

0
वनविभागाच्या आदेशाला केराची टोपली; वरिष्ठांचे धाबे दणाणणार, 'अर्थ'पूर्ण व्यवहारांची जोरदार चर्चा? पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): पुण्याची हवा आणि येथील खुर्चीची ऊब एकदा लागली की अधिकाऱ्यांना...

प्रल्हाद सोनवणे यांची भाजपा आदिवासी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

0
जळगाव जिल्ह्याला प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व; आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा संकल्प जळगाव | प्रतिनिधी – विनोद पवार भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा...

सात कोटींच्या निधी वळविल्याच्या प्रकरणाची पुनरचौकशी करा; माहिती अधिकारातून धक्कादायक तफावत समोर

0
माहिती अधिकार महासंघाची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे पांडुरंग गायकवाड यांचे निवेदन गंगापूर | प्रतिनिधी जिल्हा परिषद सिंचन विभागातील सन २०१७ मधील सुमारे सात कोटी रुपयांचा निधी...

error: Content is protected !!