Homeराजकीयजळगावात भीषण अग्नितांडव गॅस सिलेंडरच्या स्फोटाने ३ घरे जळून खाक

जळगावात भीषण अग्नितांडव गॅस सिलेंडरच्या स्फोटाने ३ घरे जळून खाक

विनोद पवार ( जळगाव  प्रतिनिधी ) : शहरातील कृपा चौक परिसरात रविवारी (दि. १५ फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत तब्बल तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली.

स्फोट इतका तीव्र होता की, आगीच्या ज्वाळांनी शेजारील घरांनाही वेढले. लाकडी पार्टिशन व अरुंद रस्त्यांमुळे आग वेगाने पसरली. घरातील संसारोपयोगी साहित्य, कपाटात ठेवलेली रोकड, सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. काही क्षणांतच कुटुंबीयांचा संपूर्ण संसार राखरांगोळी झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, सुरुवातीला शॉर्ट सर्किट होऊन त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांना धीर दिला असून तातडीच्या शासकीय मदतीची मागणी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घरगुती गॅस व विद्युत उपकरणांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक...

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा...

एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी...

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी...

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे...

error: Content is protected !!