Times of Maharashtra Desk: काही दिवसांपासून महावीकस आघाडीमध्ये शिवसेना – मनसे युतीबद्दल मतभेद सुरू आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबत जाण्यास नकार दिला असून विजय वडेट्टीवार यांचा मात्र मनसेला सोबत घेण्याकडे कल आहे. राष्ट्रवादीचे शरद पवारही मनसेला सोबत घेण्याविषयी सकारात्मक आहेत. पण कॉँग्रेस निर्णयावर थांब असून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कॉँग्रेसच्या निर्णयावर बोचक पोस्ट केली आहे.
संजय राऊत म्हणाले की शिवसेना आणि मनसे हे आधीपासूनच एकत्र आले आहेत, ही लोकांची इच्छा आहे. तसेच दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला सोबत घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय वैयक्तिक असल्याचंही ते म्हणाले. पण अद्यापही मनसेने ते शिवसेने सोबत युती करत असल्याचे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सणजे राऊत यांच्या या पोस्टमुळे खर्च शिवसेना- मनसे एकत्र निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नक्की काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी ट्विट करत दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही: मुंबई काँग्रेस हा काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा! अशी टीका केली आहे.
एकीकडे काँग्रेसचा निर्णय काहीही असो, मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासाठी इतर लहान पक्षांचाही पाठिंबा आहे त्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असे संजय राऊत यांचे मत आहे तर दुसरीकडे शरद पवारांप्रमाणे मलाही आघाडी करूनच लढावे, विचार जुळत नसले तरी भाजपविरोधात सगळ्यांनी एकत्र यावं असेही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार की मनसेचा दूसरा काही निर्णय असणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.






















