Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र पोलिसांना स्फोटांची धमकी देणारा ईमेल मिळाला; मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली...

महाराष्ट्र पोलिसांना स्फोटांची धमकी देणारा ईमेल मिळाला; मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली…

मुंबई शहर सध्या भारत-पाकिस्तान तणावामुळे उच्च सतर्कतेवर आहे.

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांना सोमवारी एका अज्ञात ईमेलवरून पुढील दोन दिवसांत स्फोट होण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांसह इतर अँटी-टेरर एजन्सीजनी सुरू केली असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कोलाबा येथील महाराष्ट्र कंट्रोल रूमला ‘ममता बोरसे’ नावाच्या आयडीवरून हा ईमेल आला होता.

ईमेलमध्ये लिहिलं होतं, “मी विनंती करते की तुम्ही (पोलिस) आज, उद्या आणि परवा सतर्क राहा कारण ‘एक मोठा स्फोट अचानक होणार आहे… त्यामुळे कुठे आणि कधी होईल हे शोधायला वेळ मिळणार नाही… पण तो जवळच आहे. त्यामुळे हे आपल्या राज्यात किंवा देशात कुठेही होऊ शकतं, म्हणून कृपया दुर्लक्ष करू नका.”

पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिस कंट्रोल रूम आणि ट्रॅफिक पोलिस कंट्रोल रूमला दररोज अशा धमकीचे किंवा इशाऱ्याचे कॉल आणि मेसेज येतात. प्रत्येक कॉलची चौकशी केली जाते आणि जर कुणी खोडसाळपणा केला असेल, तर संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई होते.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆

माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, आमदार रवी राणा यांनाही सोमवारी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी नॉन-कॉग्निजेबल गुन्हा नोंदवला आहे.

गेल्या काही महिन्यांत, अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि राजकारणी झीशान सिद्दीकी यांच्यावर हल्ल्याच्या धमक्यांचे अनेक कॉल आणि मेसेज मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!