Homeताज्या बातम्यानंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO...

नंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO पुणेकडे केली तक्रार…

पुणे :- पुण्यात वाहनांच्या नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी रोजमेर्ता सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या कंपनीला दिलेल्या टेंडरअंतर्गत विविध ठिकाणी डिलर व डिस्ट्रीब्यूटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या डिलर्सकडून नंबर प्लेट फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली वाहनधारकांकडून अवैधपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अँटी करप्शन स्क्वॉडचे सर्व भारत अध्यक्ष वाजीद एस. खान यांनी यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे की, दिनांक १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सहकारनगर येथील “रोजमेर्ता एचएसआरपी फिटमेंट सेंटर” मध्ये त्यांनी स्वतः वाहनाची नवीन नंबर प्लेट बसवली असता, तिथे अतिरिक्त १०० रुपये ‘फिटींग चार्जेस’ म्हणून आकारण्यात आले.

तसेच, जुन्या नंबर प्लेट्सही सेंटरने परत न करता स्वतःकडेच ठेवल्या असून, त्यांचा गैरवापर झाल्यास जबाबदारी कोणाची हे अस्पष्ट आहे.

वाजीद खान यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की

अशा डिलर/डिस्ट्रीब्यूटरवर तातडीने कारवाई करण्यात यावी,

ग्राहकांकडून बेकायदेशीररित्या घेतले जाणारे फिटमेंट चार्जेस त्वरित थांबवण्यात यावेत,

तसेच यासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी करून जनतेला माहिती देण्यात यावी.

ग्राहकांच्या फसवणुकीचे हे प्रकार थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

यावर पुणे आरटीओ कडून देखील कारवाई करण्याचे संकेत दिले गेले आहे. तसेच कोणत्याही एजन्सीने अतिरिक्त शुल्क मागितल्यास त्याची तक्रार आरटीओ कडे करण्यास सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!