Homeताज्या बातम्याविनयभंगाच्या प्रकरणाशी महावितरणचा संबंध नाही ; महावितरणाने केले स्पष्ट...

विनयभंगाच्या प्रकरणाशी महावितरणचा संबंध नाही ; महावितरणाने केले स्पष्ट…

पुणे :- महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात एका अपंग महिलेशी गैरवर्तन केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधीत महिला ही त्या कार्यालयात लिपीक म्हणून काम करते तर आरोपी हे अधिक्षक अभियंता या पदावर आहेत.या सर्व प्रकारावर महावितरणक़डून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले असून ‘तो’ प्रकार महावितरणशी संबंधित नाही असा निर्वाळा करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला अपंग असून, महावितरणच्या रास्ता पेठेतील कार्यालयात लिपिक आहेत. अधीक्षक अभियंता कुरसुंगे यांनी महिलेच्या कामात चुका काढून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली.महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले. तक्रारदार महिला अपंग असल्याने सहकारी बोंद्रे, धावरे यांनी त्यांचा तिरस्कार केला.

त्यांना त्रास दिला. धावरे याने महिलेच्या खुर्चीवर खाज येणारी भुकटी टाकली. भुकटीमुळे महिलेला त्रास झाला. या प्रकरणी अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसुंगे (वय ४८ रा. विमाननगर), महिला आरोपी (वय ३६ रा. कोथरुड), विकास धावरे (वय ३० रा. धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर भाष्य करताना महावितरण यांनी लेखी स्पष्टीकरण दिले असून , एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंता व दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध रास्तापेठ येथील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा प्रकार आणि अभियंता व कर्मचारी देखील महावितरणशी संबंधित नाही. काही वृत्तपत्रांमध्ये विनयभंग प्रकरणी महावितरणचा उल्लेख करण्यात आल्यामुळे हा खुलासा करण्यात आला असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.या प्रकरणातील आरोपी कर्मचारी नेमके कुठले होते याचे स्पष्टीकरण मात्र महावितरणाने दिले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!