Homeताज्या बातम्यामनोज जरांगे लोकांना म्हणत झाले भावुक आता आता खूप शिका, मोठे व्हा...

मनोज जरांगे लोकांना म्हणत झाले भावुक आता आता खूप शिका, मोठे व्हा असा मनोज जरांगे यांचा आव्हान

मनोज जरांगे लोकांना म्हणत झाले भावुक आता आता खूप शिका, मोठे व्हा असा मनोज जरांगे यांचा आव्हान…

मुंबई : मधल्या काळात खूप संकट आले. राज्यातील आमच्या समाजातील काही लोकांनीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी खूप संघर्ष केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी उधळून लावली. मी मागे हटलो नाही.

समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे हेच माझे मत होते. सगेसोयराचा अध्यादेश निघाला. मराठा समाजाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका, मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, कधी नाही. उपोषण जीवावर घेतलं आहे. मी कधी दिसून दिले नाही पण लेकरं मोठी व्हायला हवी अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक आवाहन केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खूप दशकानंतर या यशाची मराठा समाज वाट बघत होता. कायम मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम केले जायचे. मराठे इतक्या ताकदीने मुंबईला आले. ६४ किमी रांग लागली होती. कोट्यवधी मराठा मुंबईत घुसला त्यानतंर दुसऱ्याच दिवशी अध्यादेश काढला. मराठा समाजाला मी मायबाप मानले, समाजाने लेकराचा दर्जा दिला. समाजाला हाक दिली तेव्हा समाज पाठिशी उभा राहिला. वेळेप्रसंगी माझ्या जीवावर बेतलं. पण काम करताना कधी हयगय केली नाही. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच असं त्यांनी सांगितले.

तसेच माझ्या समाजानं खूप त्याग केलाय. अनेकांची कुटुंब उघड्यावर आहे. ज्या मायमाऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसलंय, कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरावर काय बेततं हे बोलणे सोप्पे असते. मी लवकरच अशा कुटुंबाची भेट घेणार आहे. आपण जिद्दी आहोत, एका ध्येयावर अडलो तर मरायलाही मागे हटत नाही. समाज एकजूट झाला तर श्रीमंतांची गरज असावी असं काही नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं, मला साथ द्यायची. समाजाची शक्ती समाजासाठीच वापरते. आता जबाबदारी वाढली, वेळेप्रसंगी जीव गेला तरी आरक्षण मिळवून द्यायचे हे मी ठरवलं. मी समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, जर मला फसवलं तर मी एकटा मुंबई चालू देणार नाही. दगाफटका होणार नाही. कायदा पारित होईल. कायदा पारित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आरक्षणापासून मराठे वंचित राहणार नाही. हे श्रेय समाजाचे आहे. माझेही नाही. माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. रात्री ११ ते ३ वकील, तज्ज्ञ बोलावले. एका एका शब्दावर मंथन केले आहे. यापुढे लोकांना काय समजावून सांगायचे, कसं प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी तालुकास्तरावर टीम तयार करणार आहे. शिंदे समितीच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. लेकरांनी मोठे व्हावे, वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला यायची तयारी आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!