Homeताज्या बातम्यागृहिणी ते Mrs. Radiance 2025; शर्मिला पाटणे यांची झळाळती वाटचाल...

गृहिणी ते Mrs. Radiance 2025; शर्मिला पाटणे यांची झळाळती वाटचाल…

गृहिणी ते Mrs. Radiance 2025: शर्मिला पाटणे यांची झळाळती वाटचाल, स्वतःच्या प्रकाशाचा शोध…

पुणे – स्वप्न पाहणं ही ताकद असते, आणि ती पूर्ण करण्यासाठी गरज असते धैर्याची. हाच प्रेरणादायी प्रवास घडवला आहे .शर्मिला पाटणे यांनी – एका समर्पित गृहिणीपासून Mrs. Radiance 2025 या किताबापर्यंतचा. पुण्यात Diva Pageants यांच्या वतीने आयोजित Mrs. India – Empress of the Nation 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत, हयात हॉटेल पुणे येथे २६ ते २९ जूनदरम्यान झालेल्या कार्यक्रमात, शर्मिला यांनी आपल्या आत्मविश्वासाने आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने परीक्षकांची मनं जिंकली.

Mrs. Radiance 2025 Sharmila Patne

घर सांभाळताना, मुलं – तपस आणि केया – यांची काळजी घेत, नवऱ्याची साथ लाभलेली असूनही, स्वतःसाठी एक स्वप्न जपणं, ते मनात साठवत ठेवणं आणि योग्य क्षणी त्याचं तेजस्वी रूपात फुलणं – हाच त्यांच्या यशामागचा खरा प्रवास.

“मी फक्त गृहिणी नव्हते. माझ्या अस्तित्वाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात मी अजूनही ते स्वप्न जपून ठेवलेलं होतं – स्वतःच्या प्रकाशात झळकण्याचं,” शर्मिला सांगतात.

घरातील जबाबदाऱ्या, मुलांचे कॉलेज ,रोजचं जेवण – या सगळ्याला बाजूला न करता त्यांनी त्या स्वप्नासाठी वेळ काढला. चार दिवस घरापासून दूर राहणं हा निर्णय त्यांच्यासाठी सर्वात कठीण होता. पण धैर्य, इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा ठाम पाठिंबा – यांच्यावर विश्वास ठेवून त्या त्या मंचावर पोहोचल्या.

स्पर्धेच्या Talent Round मध्ये त्यांचा योगासनोंचा सादरीकरण विशेष गाजलं. त्त्या क्षणाबद्दल सांगताना त्या म्हणतात, “योगगुरु हर्षद भोसले यांनी मला आसनांचा सुंदर फ्लो शिकवला. त्यांच्या मार्गदर्शनाने माझं सादरीकरण आत्मविश्वासाने पार पडलं.”

स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकार दिवेश कुडवाळकर यांच्या आभारही त्या मनापासून मानतात.

“हा मुकुट फक्त माझा नाही,” त्या हसून सांगतात,

“हा माझ्या मुलांचा – तपस आणि केया – यांचा आहे, जे माझ्या अनुपस्थितीत खंबीर राहिले; माझ्या पती प्रमोद पाटणे यांचा आहे, ज्यांनी मला निःसंशय पाठिंबा दिला. या प्रवासात त्यांची साथ नसती, तर मी इथपर्यंत पोहोचलेच नसते.”

या यशातून त्यांनी एक गोष्ट सिद्ध केली – 

गृहिणी म्हणून आपली स्वप्नं मागे ठेवायची गरज नाही, उलट ती स्वप्नं आपल्यालाच प्रेरणा देतात – स्वतःला शोधण्याची!

“हो, स्वप्न पूर्ण होतात. म्हणूनच सांगते – गृहिणी असलो म्हणून काय झालं? आपल्यालाही स्वप्नं बाळगायची आणि ती जिंकायची पूर्ण पात्रता आहे,” त्या आत्मविश्वासाने सांगतात.

आज शर्मिला पाटणे या फक्त Mrs. Radiance 2025 नाहीत, तर त्या प्रत्येक स्त्रीचं प्रतीक आहेत जिने आपल्या स्वप्नांना घराच्या भिंतीआड जपून ठेवलंय.

कारण खरंच – स्वतःचा प्रकाश शोधायला आणि झळकायला कधीच उशीर होत नाही.

Mrs. Radiance 2025 Sharmila Patne

अधिक माहिती साठी आपण शर्मिला पाटणे यांना खालील लिंकवर संपर्क साधू शकता.

https://www.instagram.com/sharmila_patne?igsh=dzVjdXN6N2ppbjRq

अश्या आणखीन यशोगाथा किंवा आपली माहिती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क – 7887776668

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!