Homeक्राईमचापडगाव सबस्टेशन चोरी प्रकरण उघड: तांत्रिक तपासातून ३ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल...

चापडगाव सबस्टेशन चोरी प्रकरण उघड: तांत्रिक तपासातून ३ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

शेवगाव (प्रतिनिधी जयप्रकाश बागडे) :  तालुक्यातील चापडगाव येथे वीज मंडळाच्या सबस्टेशनमध्ये झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

२२ एप्रिलच्या मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी चापडगाव येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी वॉचमन गोकुळ संपत मडके (रा. गदेवाडी) यांच्यावर लाकडी दांडके व गजाने हल्ला करून गंभीर मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरची मोडतोड करत त्यातील सुमारे ९९० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि ५३० किलो कॉपर कॉइल असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी भीमा लक्ष्मण म्हस्के, अविनाश कल्याण धुरंधरे आणि अमोल गणेश रांजवन (सर्व रा. बीड) हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीत वापरलेली शिफ्ट कारसह एकूण ५ लाख ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याकडून सुरू असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोधही घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!