Times of Maharashtra Desk, Mumbai Attacks 26/11: जवळ जवळ 17 वर्षांपूर्वी महराष्ट्रात एक काळा दिवस उजाडला होता. २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण होत आहेत. याच 17 व्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित समारंभात, नेत्यांनी २६/११ च्या शहीदांना आणि बळींना श्रद्धांजली वाहिली.२००८ ची ती भयानक रात्र, जेव्हा पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत दहशत माजवली होती, ती रात्र अजूनही लोकांच्या आठवणीत ताजी आहे.त्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, नरिमन हाऊस, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लिओपोल्ड कॅफे सारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला केला. ६० तास चाललेल्या सततच्या गोळीबार आणि स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरुन गेला होता. या हल्ल्यांमध्ये १८ शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला. ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.
१७ वर्षे उलटून गेली, पण कोणताही भारतीय त्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला विसरलेला नाही. – भाजप नेते प्रकाश जावडेकर
मुंबई हल्ल्याच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रद्धांजली वाहताना भाजप नेते प्रकाश जावडेकर म्हणाले १७ वर्षे उलटून गेली, पण कोणताही भारतीय त्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला विसरलेला नाही. शेकडो लोक मारले गेले, पोलिस अधिकारी शहीद झाले. ही पाकिस्तानची रणनीती होती.कसाबने स्वतः कबूल केले की तो पाकिस्तानचा आहे आणि हे न्यायालयात सिद्ध झाले. म्हणूनच, पाकिस्तानची भूमिका अगदी स्पष्ट होती आणि म्हणूनच आपल्याला दहशतवादाविरुद्धची आपली लढाई आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे. दिल्लीत अलिकडेच झालेला स्फोट हा देखील गंभीर चिंतेचा विषय आहे. तथापि, आपण भाग्यवान आहोत की 2,500 किलोपेक्षा जास्त स्फोटके आधीच जप्त करण्यात आली आहेत. इतके ड्रोन हल्ले आणि मोठे कट उधळण्यात आले आहेत. म्हणूनच, आपण आपल्या सुरक्षा दलांना, तपास संस्थांना आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला सलाम केला पाहिजे.
तसेच पंतप्रधान मोदी आता जी 20 परिषदेत गेले होते या परिषदेत जी-20 देशांनीही निर्णय घेतला आहे की दहशतवाद आणि दहशतवादी नेटवर्कला होणारा निधी रोखण्यासाठी संयुक्त कारवाई आवश्यक आहे. जग याच्याशी सहमत आहे असे देखील त्यांनी सांगितले






















