Times Of Maharashtra Desk : मुंबईहून बारामतीस निघालेल्या विमानाचा बारामतीजवळील गोजुबावी परिसरात कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीपक्षाचे प्रमुख मा. आजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेवटपर्यंत लढणारा योद्धा
आज बारामती येथे जिल्हा परिषद,पंचायत निवडणुकीसाठीच्या चार प्रचार सभा होत्या त्यासाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने येत होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच काहिमीनिट अगोदर गोजुबावी परिसरात कोसळले.
हा अपघात इतका भीषण होता की विमान खाली कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटाने प्रचंड लागलेल्या आगीत मा.अजित पवार यांचेसह आणखी ५ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट सुमित कपूर, कॅप.संभवी पाठक,फ्लाईटअटेंडंट पिंकी माळी, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव यांचा समावेश आहे. झालेल्या या आपघातामुळे महाराष्ट्रावर शोककाळा पसरली आहे.
भारताचे पंतप्रधान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे ,राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर,सुशीलकुमार शिंदे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासह अनेक मान्यवरानी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकाकुल जनसागर बारामतीकडे लोटला लोकांच्या भावनाआणि झालेली गर्दी लक्षात घेऊन अजित पवार यांचे पार्थिव शारदा प्रांगण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या आपघातमुळे महाराष्ट्राभर शोककाळा पसरली आहे. उद्या अंत्यसंस्कार
अंत्यसंस्कार उद्या दि.२९ रोजीसकाळी ११.०० वा. बारामती येथे विद्याप्रतिष्ठान संकुलाच्या मैदानावर करण्यात येणार आहेत.याअंत्यसंस्कारास पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.






















