Homeताज्या बातम्याभुसावळ हादरले! साक्रीत दोन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या; नराधम आरोपी जेरबंद

भुसावळ हादरले! साक्रीत दोन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या; नराधम आरोपी जेरबंद

जळगाव प्रतिनिधी  विनोद पवार: भुसावळ तालुक्यातील साक्री गावात सोमवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. ट्युशनसाठी घराबाहेर पडलेल्या नववीतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचे मृतदेह गावाजवळील एका शेतातील विहिरीत आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी रोहन नरेंद्र चौधरी या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याने दोघींना विहिरीत ढकलल्याची कबुली दिली आहे.

नेमकी घटना काय?

मृत विद्यार्थिनी लक्ष्मी अभय महाजन (१५) आणि नयना विजय चौधरी (१५) या साक्री येथील जनता हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होत्या. सोमवारी सकाळी ७:४५ च्या सुमारास त्या ट्युशनसाठी निघाल्या होत्या. मात्र, त्या वर्गात न पोहोचल्याने पालकांनी शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या एका तरुणासोबत दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ जाताना दिसल्या. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सोपान फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ मुलींच्या शालेय बॅगा सापडल्याने एकच खळबळ उडाली.

ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठिय्या आंदोलन

घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक मुकेश कोळी यांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मात्र, आरोपीला तातडीने अटक करा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवून धरली. सुमारे सहा तास साक्री परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट केल्यानंतरच मृतदेह विच्छेदनासाठी हलवण्यात आले.

आनंदाचा सत्कार अन् दुखाचा डोंगर

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी या दोन्ही मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट नृत्य आणि लेझीम सादरीकरण केले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कारही केला होता. ज्या मुलींच्या यशाचे कौतुक संपूर्ण गाव करत होते, त्यांच्यावर काळाने असा घाला घातल्याने संपूर्ण साक्री गाव सुन्न झाले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधम आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला जलद न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

error: Content is protected !!