Homeताज्या बातम्याCongress solo decision,BMC election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस एकटीच,मावीअच्या मतभेदांचा बीजेपीला फायदा...

Congress solo decision,BMC election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस एकटीच,मावीअच्या मतभेदांचा बीजेपीला फायदा होणार का?

Times of Maharashtra Desk, BMC Election :मुंबईत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार होती. त्यासाठी जय्यत तयारी देखील तिन्ही पक्षात सुरू होती. परंतु महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतानाच कॉँग्रेसने अचानक एक निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर निवडू अशी घोषणा करत कॉँग्रेस ने ही लढाई एकट्यानेच लढायची असे ठरवले आहे. शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी कॉँग्रेसने हा निर्णय घेतला असून आता याचा फायदा बीजेपीला होण्याची शक्यता आहे. यामुळे नक्की कॉँग्रेस ने हा निर्णय घेण्यामागचे कारण काय? नेमक मावीअच्या युतीत मतभेद का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

कॉँग्रेसच्या वेगळ होण्याच कारण ठाकरे बंधु?
मुंबई काँग्रेसला बीएमसी निवडणूक स्वतंत्रपणे लढायची होती.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान आम्ही तडजोड केली होती, पण आता आमच्या स्थानिक युनिटमधील पदाधिकाऱ्यांना वाटते की ही महानगरपालिका निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढली पाहिजे , आणि यात काहीच चुकीचे नाही. असे काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की ” काही दिवसपूर्वी राज्यभरातील कथित मतदार यादीतील अनियमिततेविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेबरोबर रॅली काढली होती त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षां गायकवाड यांनी “काँग्रेस राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेशी हातमिळवणी कशी करू शकते?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सध्या आम्ही ही लढाई एकट्यानेच लढवण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले यावरून सध्या चालू असलेल्या घडामोडीवरुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचा कॉँग्रेस सोबतचा तिढा वाढत आहे असे दिसून येते.

याचा फायदा बीजेपीला होणार का?
एकीकडे महावीकस आघाडी मध्ये वाढलेला असंतोष तर दुसरीकडे बीजेपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढील ५ वर्ष मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे. महावीकस आघाडीत वाढणाऱ्या या तणावाचा फायदा बीजेपीला होण्याची शक्यता सध्या नाकारता येत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सध्या आपआपल्या पक्षात निवडणुकीची रणनीती आखत आहेत. त्यामुळे या परिस्थित ते काय रणनीती आखणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे.

जोपर्यंत काँग्रेस आपल्या उणिवा स्वीकारत नाही आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न हाती घेत नाही, तोपर्यंत त्यांचे भविष्य अंधकारमय राहील.”- देवेंद्र फडणवीस

येणाऱ्या आगामी निवडणुकीत बीजेपी त्यांच्या मित्रपक्षा सोबत निवडणूक लढवणार आहे. तसे भाजपने स्पष्ट देखील केले आहे. तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत, भाजपाने तेथील स्थानिक परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार आपल्या स्थानिक युनिट्सना दिले . महावीकस आघाडीतील या मतभेदा विषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “विरोधी पक्षाने बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढल्या तरी फारसा फरक पडणार नाही. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत.”काँग्रेसची खरी समस्या केंद्र स्तरावरचे राहुल गांधी यांचे नेतृत्व आहे, जे लोकांना काय हवे आहे हे समजून घेण्यात अयशस्वी ठरले आहे,जोपर्यंत काँग्रेस आपल्या उणिवा स्वीकारत नाही आणि तळागाळातील लोकांचे प्रश्न हाती घेत नाही, तोपर्यंत त्यांचे भविष्य अंधकारमय राहील.” असा टोला देखील त्यांनी राहुल गांधीना मारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

error: Content is protected !!