Homeपर्यावरणJunnar Leopard Conflict: अखेर बिबट्यांचे निर्बीजीकरण; वनमंत्री नाईक यांची माहिती; जुन्नरमध्ये देशातील...

Junnar Leopard Conflict: अखेर बिबट्यांचे निर्बीजीकरण; वनमंत्री नाईक यांची माहिती; जुन्नरमध्ये देशातील पहिला प्रयोग

Times of Maharashtra Desk, Pune: जुन्नर वन विभागात वाढत्या मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बिबट्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प देशातील पहिलाच असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात अंदाजे 115 बिबट्यांचे निर्बीजितीकरण करण्याची तयारी सुरू असून या प्रक्रियेसाठी आवश्यक पिंजरे, तज्ज्ञ पथके आणि तांत्रिक साधनसामग्री तयार ठेवण्यात येत आहे.

या उपक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरे आणि अलर्ट सिस्टीम बसवली जाणार असून, बिबट्या मानवी वस्तीकडे आल्यास सायरन वाजवून स्थानिकांना सतर्क केले जाणार आहे. सध्या विभागात सुमारे 200 पिंजरे आहेत. परंतु प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी ती संख्या एक हजारापर्यंत वाढवण्याचा विचार आहे. बिबट्यांच्या हालचालींचे अचूक निरीक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

मानवी वस्ती आणि जंगल यांच्या सीमारेषेवर बांबूची भिंत उभारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. तीन वर्षांच्या चक्रात कापणी करून या भिंतीची नियमित देखभाल केली जाणार आहे. त्याचबरोबर, काही निवडक बिबट्यांना वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास वाढवण्यासाठी वनक्षेत्र विस्तारालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

या सर्व उपाययोजनांसाठी सरकारने सुमारे 11 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बिबट्यांची वाढती संख्या, मानवी वस्त्यांतील त्यांची वर्दळ आणि गेल्या काही वर्षांत वाढलेल्या हल्ल्यांच्या घटनांची पार्श्वभूमी पाहता हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील इतर संघर्षग्रस्त भागांमध्येही तो अंमलात आणण्याचा विचार शासनाने केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!