Homeताज्या बातम्याPMC Ward No. 5: विकासकामांचे यश, पण पूर आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न...

PMC Ward No. 5: विकासकामांचे यश, पण पूर आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न गंभीर; निवडणुकीत तगडी लढत!

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ कल्याणीनगर-वडगाव शेरीमध्ये विकासकामांचा जोर असतानाही पूर, रस्त्यांचे रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न आजही कायम आहेत. या मूलभूत समस्यांच्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाकांक्षी प्रभागातील आगामी निवडणूक भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेतील हा पाचवा प्रभाग असून कल्याणीनगरपासून शांती रक्षक सोसायटी, पेपल सेमिनरीपर्यंत याचा विस्तार आहे.

या प्रभागाची एकूण लोकसंख्या ९१,३८१ इतकी आहे. प्रभागामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या ८,४०३ असून, अनुसूचित जमातीतील मतदारांची संख्या ७९ इतकी आहे.

कल्याणी नगर, रामवाडी, सैनिकवाडी, मते नगर, वडगांवशेरी गावठाण, कुमार प्रिमावीरा, गणेश नगर, बाजीराव नगर, महादेव नगर, गलांडे नगर, दिगंबर नगर, आगाखान पॅलेस, मेरिगोल्ड कॉम्प्लेक्स, ब्रम्हा सनसिटी, साईनाथ नगर, येरवडा स्टड फार्म, हर्म्स हेरीटेज, शांती रक्षक सोसायटी,पेपल सेमिनरी, जुना मुंढवा रस्ता, पुण्यनगरी आणि आनंद पार्क या भागामध्ये हा प्रभाग पसरलेला आहे.

आतापर्यंत झालेली विकासकामे

प्रभागात राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, क्रीडांगणे, नवीन पाणीटाक्या, लाइट हाऊस, कल्याणीनगर नदीवरील पूल अशा अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. तसेच प्रभाग टँकरमुक्त करण्याच्या दिशेनेही पाऊल टाकले गेले आहे.

तरीही या समस्या कायम

उज्ज्वल गार्डन, सैनिकवाडी, हरीनगर, कल्याणीनगर आणि इतर अनेक ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठून पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. ज्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते.

या भागामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असून छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडीरस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. तसेच, डीपी रस्ते विकसित करणे आणि वडगाव शेरी ते वारजे नदीपात्रातील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.

अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजलाइनचे लीकेज आणि काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार ड्रेनेजलाइन सुधारण्याची मागणी आहे.

या भागात सांस्कृतिक हॉलची कमतरता आहे. कल्याणीनगरमधील पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहून रस्त्यावर होणारे पार्किंग तसेच अमिनिटी स्पेसच्या जागा विकसित न होणे, यांसारख्या समस्या कायम आहेत.

राजकीय चित्र आणि निवडणुकीचा इतिहास

विकासकामांवरील समाधान आणि समस्यांवरील असंतोष अशा दुहेरी परिस्थितीत हा प्रभाग निवडणुकीला सामोरे जात आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापुसाहेब पठारे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) सुनील विजय टिंगरे यांचा ४,७१० मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता. २०१९ मध्ये सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता.

या प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व गटातील इच्छुकांची भाऊगर्दी नेहमीच दिसून येते. ज्यामुळे मतविभाजनाचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!