Times Of Maharashtra Desk : तिसरे अपत्य निवडणुकीस अडथळा ठरेल म्हणून बापाने केली आपल्या पोटच्या मुलीची हत्त्या.सदर घटना नांदेड जिल्ह्यातील केरूर या गावात घडली. केरूर ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पद हे OBC प्रवर्गासाठी आरक्षित असून आपली तिसरी मुलगी आपल्याला निवडणुकीसाठी अडथळा ठरेल म्हणून बापानेच पोटच्या मुलीची हत्त्या केल्याचे तपासतात निष्पन्न झाले आहे.
बापच ठरला क्रूरकर्मा
आरोपीचे नाव पांडुरंग धोंडा मंगले असे असून प्राची (वय ७)असे या दुर्दैवी मुली आहे.
आरोपीने आपल्या मुलीला सायकलवर बसवून तेलंगना राज्यातील तडपल्ली जवळच्या कॅनॉल मध्ये फेकून दिले.सुरवातीला आर्थिक विवंचनेतून हे कृत्य केल्याचा बनाव केला होता पण नंतर मात्र त्याने गुन्हा कबूल केला.या कटामध्ये आरोपीची पत्नी आणि गावचे सरपंच यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
व्हायचं होतं सरपंच!
सदर आरोपी मुखेड येथे केशकर्तनालय चालवत असून तिसरे अपत्य अडथळा ठरू शकेल का? याबाबत त्याने औरंगाबाद येथील एक वकिलाकडून कायदेशीर सल्ला घेतला होता. गावातील काही राजकीय मंडळींनी आरोपीस निवडणूक लढविण्यासाठी भरीस पाडले होते. राजकारणाच्या नादी लागून माणूस एवढ्या खालच्या पातळीला जावून किती क्रूर बनतो हे या घटनेन दाखवून दिले. या घटनेन सारा गाव हादरून गेलं आहे.






















