Homeउद्योगभारत–अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब; अमेरिकेचे शुल्क २५ % वरून १८% पर्यंत कमी.

भारत–अमेरिका व्यापार करारावर शिक्कामोर्तब; अमेरिकेचे शुल्क २५ % वरून १८% पर्यंत कमी.

Times Of Maharashtra Desk : भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार संबंधांना नवे बळ देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधल्यानंतर या कराराची माहिती दिली. या करारानुसार, अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क २५  टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे.या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार

“आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधणे अत्यंत आनंददायी होते. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता १८ टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचा मला विशेष आनंद आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारताच्या १.४ अब्ज जनतेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मनापासून आभार,” -पंतप्रधान नरेंद्र मोदी

जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा थेट फायदा दोन्ही देशांच्या जनतेला होतो. परस्पर सहकार्यासाठी यामुळे मोठ्या संधी निर्माण होतील. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण असून शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा आहे.असे मतही त्यांनी व्यक्त केले.

व्यापार करारावर परस्पर सहमती

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कराराबाबत सोशल मीडियावर सविस्तर निवेदन जारी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीवरून आणि परस्पर मैत्रीच्या नात्यावर आधारित भारत–अमेरिका व्यापार करारावर सहमती झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. या करारानुसार, अमेरिका भारतावरील परस्पर शुल्क २५  टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल, तर भारत अमेरिकेवरील शुल्क तसेच नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.याशिवाय, ट्रम्प यांनी असा दावाही केला की भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवून अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल आयात करण्याचा विचार करेल.

मोदी–ट्रम्प दूरध्वनी संवाद

सोमवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात दोन्ही नेत्यांनी व्यापारासह विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले  हा माझ्यासाठी सन्मान होता. ते माझे अत्यंत जवळचे मित्र असून त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेतअसे म्हटले आहे . या व्यापार करारामुळे भारत–अमेरिका संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!