Homeक्राईमपाचोरा कृषी कार्यालयात एसीबीचा सापळा; अनुदानासाठी लाचखोरीचा पर्दाफाश

पाचोरा कृषी कार्यालयात एसीबीचा सापळा; अनुदानासाठी लाचखोरीचा पर्दाफाश

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी )

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या शासकीय योजनाच लाचखोरीच्या विळख्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा येथे समोर आला आहे. शेती साहित्यावरील अनुदान मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर जळगाव एसीबी पथकाने थेट कारवाई करत मोठा सापळा रचला आहे.

या कारवाईत पाचोरा कृषी कार्यालयातील उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी शेतकऱ्याकडून ६ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ५ हजार रुपये स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील एका शेतकऱ्याने शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी अनुदान मिळावे म्हणून ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र अर्ज मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. यानंतर शेतकऱ्याने धाडस दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचला. या वेळी व्यावसायिक संजय पाटील गैरहजर असल्याने, त्याच्या सांगण्यावरून नितीन निकम याने लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. देशमुख, संजय पाटील व नितीन निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई नाशिक पोलीस परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, या प्रकरणामुळे कृषी विभागासह संपूर्ण शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!