Homeक्राईमपंढरपूर हादरवणाऱ्या मायलेकाच्या दुहेरी हत्येचा उलगडा; आठ महिन्यांनी आरोपी गजाआड.

पंढरपूर हादरवणाऱ्या मायलेकाच्या दुहेरी हत्येचा उलगडा; आठ महिन्यांनी आरोपी गजाआड.

Times Of Maharashtra Desk : पंढरपूरआषाढी वारीनंतर पंढरपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल आठ महिन्यांपासून गुन्हेगारांचा माग काढण्यात अपयश येत असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. आंदोलने, तपास अधिकाऱ्यांची बदली आणि विविध तपास पथकांची नेमणूक होऊनही या प्रकरणाचा छडा लागत नव्हता. अखेर तपासाची सूत्रे आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या हाती आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

असा धडला गुन्हा

लखन संजय जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप यांची रात्री साडेनऊच्या सुमारास भर वस्तीत त्यांच्या घरात घुसून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. लखनवर तब्बल १६ वार करण्यात आले तर संजय याच्या आईवर नऊ वार करून तिचीही हत्या करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांत आरोपींनी दुहेरी खून करून पलायन केले होते.

हा तपास एक आव्हान होते.

घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपासात मोठे आव्हान उभे राहिले होते. तपासादरम्यान खुनासाठी गवत कापण्याच्या मशीनच्या पात्यांपासून खास बनवलेले हत्यार वापरल्याचे समोर आले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी विशाल शिंदे नाईक याने स्वतःच पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली होती. तसेच, घरातील ५५ इंची टीव्ही आणि काही साहित्य चोरून नेल्याचा बनाव करून चोरीचा आभास निर्माण करण्यात आला होता.या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड झाला आहे.

अखेर शोध लावला

पोलिसांच्या खबऱ्याने महत्त्वाची माहिती मिळवल्यानंतर तपासाला निर्णायक वळण मिळाले. विशाल शिंदे नाईक आणि त्याचा सहकारी अथर्व शिंदे नाईक यांना अटक करण्यात आली असून, दोघेही जगताप कुटुंबीयांचे शेजारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजारधर्मातील वैमनस्य हेच खुनामागील प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हत्या केल्यानंतर आरोपी राजस्थानला कामासाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशालचा मोबाईल फोन घटनेच्या वेळी सुमारे एक तास बंद होता. फोन बंद करण्यापूर्वी त्याने सहआरोपीशी संपर्क साधल्याचे तांत्रिक पुराव्यांतून स्पष्ट झाले.चौकशीत आरोपींनी चोरी केलेला टीव्ही आणि खुनाचे हत्यार चंद्रभागा नदी पात्रात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी नदीपात्रातून साहित्य जप्त केले आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या दुहेरी हत्याकांडामुळे पंढरपूर पोलिसांवर गेल्या आठ महिन्यांत मोठी टीका झाली होती. मात्र, नव्या तपास पद्धतीमुळे अखेर गुन्ह्याचा उलगडा होऊन आरोपी गजाआड झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!