Homeमहाराष्ट्रपॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’ पुढे सरसावले आहे. फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

बक्षू शेख हे गेल्या काही काळापासून पॅरालिसिसने आजारी असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उपचारासाठी आवश्यक आर्थिक साधनांची कमतरता असल्याने ते घरीच उपचाराविना पडून होते. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हिमायत फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती घेत मदतीसाठी लेखी अर्ज केला.

अर्ज प्राप्त होताच फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. वस्तुस्थितीची खात्री झाल्यानंतर तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने बक्षू शेख यांना २५ हजार रुपयांची मदत देण्याचा ठराव मंजूर केला.

त्यानुसार आज त्यांना प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द करण्यात आला. सध्या त्यांच्यावर सुलतानपूर येथे उपचार सुरू आहेत.

यावेळी फाउंडेशनचे सचिव शेख मुजीब म्हणाले, “हिमायत फाउंडेशन नेहमीच गोरगरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असते. समाजाचा आमच्यावर मोठा विश्वास असून भविष्यातही सामाजिक कार्यात आम्ही अग्रेसर राहू.”

या प्रसंगी अध्यक्ष शाहरुख कुरेशी (मुफ्ती उमर), उपाध्यक्ष सय्यद सोहेल, सचिव शेख मुजीब, सहसचिव सय्यद शाकेर, प्रसिद्धी प्रमुख काझी अमान तसेच इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0
दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात...

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

error: Content is protected !!