Homeक्राईमPCMC Crime : पिंपरी-चिंचवड हादरले; भररस्त्यात गोळीबार; वैयक्तिक वादातून तरुणाची हत्या

PCMC Crime : पिंपरी-चिंचवड हादरले; भररस्त्यात गोळीबार; वैयक्तिक वादातून तरुणाची हत्या

Times of Maharashtra Desk, Pune : पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव नितीन गिलबिले वय ३७, रा. वडमुखवाडी असे आहे. आलंकापुरम ९० फूट रस्ता, चऱ्होली येथील श्री साई रोड कॅरिअरजवळ ही घटना घडली. नितीन गिलबिले हा त्याच्या दोन मित्रांसोबत एका टोयोटा फॉर्च्युनर कारमध्ये बसला होता. याचवेळी त्यांच्यात काही वैयक्तिक बाबींवरून तीव्र स्वरूपाचा वाद सुरू झाला, ज्याचे पर्यवसान अखेर गोळीबार आणि हत्येत झाले.

या वादादरम्यान, आरोपी अमित जीवन पाथरे वय ३५, रा. चऱ्होली आणि विक्रांत ठाकूर रा. सोळू, खेड या दोघांनी नितीन गिलबिले याच्यावर पिस्तूल रोखले आणि गोळी झाडली. डोक्याला गोळी लागल्याने नितीन याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी वर्दळीच्या वेळी भर रस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध दिघी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नेमली असून, त्यांच्या अटकेसाठी परिसरात आणि संभाव्य ठिकाणी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलीस या घटनेमागील नेमके वैयक्तिक कारण आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र याबाबत अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!