Homeताज्या बातम्याकोंढवा अवैध कचरा डम्पिंग प्रकरण ; कचरा साठवणुकीमुळे कोंढव्यातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर...

कोंढवा अवैध कचरा डम्पिंग प्रकरण ; कचरा साठवणुकीमुळे कोंढव्यातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…

कचरा साठवणुकीमुळे कोंढव्यातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका…

मनपा घनकचरा व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत काय? उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली…
पुणे (मुज्जम्मील शेख) -शहरातील कोंढवा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानावर अवैधरित्या डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठविण्यात येत असल्या कारणाने परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे पुणे मनपा प्रशासनाच्या घनकचरा विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने या प्रकरणी नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. या प्रकरणी कुंभकर्णी झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाने या ठिकाणी असलेला कचरा लवकर न हटवल्यास नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची खात्रिलायक माहिती प्राप्त झाली आहे.
कोंढवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानाचा वापर गेल्या अनेक दिवसांपसासून कचरा हस्तांतरणासाठी केला जात होता. लहान गाड्यांमधून आणलेला कचरा हा मोठ्या गाड्यांमध्ये टाकण्याचे काम या ठिकाणी केले जात होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी लहान गाड्या येऊन चक्क गाडीमधील कचरा ग्राउंडवरच टाकून जात आहेत. या प्रकारामुळे या मैदानावर आज एक अवैधरित्या तयार करण्यात आलेले कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड तयार झालेले आहे. अनेक दिवसांपासून कचरा या ठिकाणी पडून असल्यामुळे त्याची भयंकर अशी दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे. या घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गंभीर प्रकाराकडे उपायुक्त महापालिका घनकचरा व्यवस्थापन कार्यालय पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तात्काळ कारवाई करून हा कचरा गरजेचे आहे. असे न झाल्यास आगामी काळात परिसरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराच्या वाहनांची रात्रभर पार्किंग…
कचरा उचलण्यासाठी पुणे महापालिकेने एका ठेकेदाराची नियुक्ती केली होती. त्यांच्या सर्व गाड्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे अवैध रित्या कोणतेही परवानगी नसताना त्या ठिकाणी पार्किंग होत आहेत.
खाजगी ठेकेदाराच्या विना परवाना पार्किंग केली जाते. कोणाच्या वरदहस्ताने केली जाते. काही पुणे महापालिकेचे लोक थोड्या मोबदल्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही पायमल्ली…
कचरा साठवणुकीमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांच्या वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारे कचरा साठवणूक करू नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आहेत. परंतु कोंढवा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उच्च न्यायालयाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली होते आहे. महापालिका प्रशासन एकीकडे कुंभकर्णी झोपेत आहे, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या होणाऱ्या पायमल्लीचीदेखील मनपा प्रशासनाला जाणीव नसल्याचे दिसून येत आहे.
भाग १
क्रमशः
या प्रकरणात आणखीन गंभीर माहिती लवकरच आणणार समोर…
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!