Homeताज्या बातम्याPMC Parking Issue : पुणे महापालिकेच्या वाहनतळांवर 'पाचपट' वसुली; ठेकेदारांकडून नागरिकांची लूट

PMC Parking Issue : पुणे महापालिकेच्या वाहनतळांवर ‘पाचपट’ वसुली; ठेकेदारांकडून नागरिकांची लूट

Times of Maharashtra Desk, Pune : पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वाहनतळांवर खासगी ठेकेदारांकडून नागरिकांची दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरांपेक्षा तब्बल पाचपट अधिक शुल्क आकारून ही मनमानी वसुली केली जात आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेने शहरातील वाहनतळांसाठी दर निश्चित केलेले आहेत. यानुसार, दुचाकी वाहनासाठी प्रतितास दोन रुपये आणि चारचाकी वाहनासाठी प्रतितास चौदा रुपये असा अधिकृत दर आहे. परंतु, या नियमांना केराची टोपली दाखवत ठेकेदाराचे कर्मचारी नागरिकांकडून जबरदस्तीने जादा पैसे उकळत आहेत. उपलब्ध माहितीनुसार,दोन रुपयांऐवजी दुचाकीसाठी प्रतितास वीस ते तीस रुपये घेतले जात आहेत. तर, चौदा रुपये दर असलेल्या चारचाकीसाठी चक्क साठ ते सत्तर रुपये प्रतितास वसूल केले जात आहेत.

महापालिकेच्या विविध वाहनतळांमध्ये प्रतितास आकारले जाणारे दर
(निश्चित दर: दुचाकी दोन रु. व चारचाकी चौदा रु.)

१. कै. सतीशशेठ धोंडीबा मिसाळ वाहनतळ, मंडई : चारचाकी साठ ते सत्तर रुपये (प्रतितास)
२. हरिभाऊ साने वाहनतळ, नारायण पेठ : दुचाकी तीन रु. व चारचाकी चौदा रु. (प्रतितास)
३. शिवाजीराव आढाव वाहनतळ, नारायण पेठ : दुचाकी दहा रु. व चारचाकी वीस रु. (प्रतितास)
४. हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ, महात्मा फुले मंडई : दुचाकी तीस रुपये

शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांना या लुटीचा फटका बसत आहे. ठेकेदारांची ही मनमानी आणि उघड लूट सुरू असतानाही, पुणे महापालिका प्रशासन यावर कोणताही ठोस कारवाई करताना दिसत नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळेच ठेकेदारांचे फावत असून, सामान्य पुणेकरांच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिक त्रस्त आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!