Homeक्राईमविश्रांतवाडीतील १७ वर्षीय मुलाचा अपहरण करून निर्घृण खून; पाच आरोपी ताब्यात

विश्रांतवाडीतील १७ वर्षीय मुलाचा अपहरण करून निर्घृण खून; पाच आरोपी ताब्यात

Times of Maharashtra Desk: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड शिवापूर परिसरातील डोंगरात बुधवारी दुपारी या मुलाचा मृतदेह आढळून आला. अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादातून खुनाचा कट

पोलिस तपासानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाला होता. त्या वादात अमनसिंगकडून झालेल्या मारहाणीत प्रथमेश जखमी झाला होता. याच रागातून प्रथमेशने अमनसिंगचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून त्याला सापळ्यात ओढले. एका तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर संपर्क साधून २९ डिसेंबर रोजी त्याला खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिर परिसरात बोलावण्यात आले.

खेड शिवापूरच्या डोंगरात हत्या

अमनसिंग मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आरोपींनी त्याला डोंगर परिसरात नेले. तेथे आधीच कटात सहभागी असलेले इतर आरोपी उपस्थित होते. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगला शेवटची इच्छा विचारली होती. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून आणि दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृतदेह खड्ड्यात पुरून आरोपी फरार झाले.

बेपत्ता तक्रारीनंतर उघडकीस आले प्रकरण
२९ डिसेंबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेला अमनसिंग रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. गुन्हे शाखा युनिट-३ आणि विश्रांतवाडी पोलिसांनी समांतर तपास करत कर्नाटकातील बेळगाव येथून मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी खेड शिवापूरच्या डोंगरात खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली होती.या प्रकरणाचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!