Homeताज्या बातम्यापुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत...

पुणे महापालिका निवडणूक: लहू बालवडकर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील – चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका निवडणूक विविध वाद आणि घडामोडींमुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली, तर भाजपने या जागेसाठी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले आहे.
लहू बालवडकर यांच्या प्रचारादरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आज भविष्यवाणी करतो की महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन जो नगरसेवक निवडून येईल, तो लहू बालवडकर असेल.” त्यांनी आपल्या मागील निवडणुकांमधील अंदाजांचा उल्लेख करत आपल्या भविष्यवाण्या आजवर अचूक ठरल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठे-मोठे नेते मला विचारतात ‘दादा, काय होईल?’ आणि मी जे सांगतो ते खरं ठरतं. २०१७ साली मी मुंबई महापालिकेत ८२ जागा येतील असं सांगितलं होतं आणि तितक्याच जागा आल्या.”

बालेवाडी प्रभागाबाबत बोलताना त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, “लहू बालवडकर हे बालेवाडीमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील. लिहून ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक मतं मिळवणारे नगरसेवक लहू बालवडकरच असतील.”लहू बालवडकर यांचं नाव ईव्हीएमवर चौथ्या क्रमांकावर असलं, तरी त्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगत पाटील म्हणाले, “घोडा मैदान लांब नाही. निकालाच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.”चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, आता मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!