Homeताज्या बातम्यापुण्यातील सायबर पोलिसांची मोठी कारवाई: ६.२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एक आरोपी अटकेत...

पुण्यातील सायबर पोलिसांची मोठी कारवाई: ६.२९ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी एक आरोपी अटकेत…

पुणे शहरातील सायबर गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने ६ कोटी २९ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पनवेल येथून एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असून त्याने त्याच्या वडिलांसोबत संगणमत करून एका जेष्ठ नागरिकाला ‘डिजीटल अरेस्ट’च्या नावाखाली विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली होती.

ही घटना ९ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली. अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून फिर्यादीला फोन करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असल्याचे सांगण्यात आले. चौकशीच्या नावाखाली त्यांना सातत्याने धमकावून, भीती दाखवून, पैसे वेगवेगळ्या खात्यांत पाठवण्यास भाग पाडण्यात आले. एकूण ६.२९ कोटी रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग करण्यात आले.

पोलिस तपासात समोर आले की, फसवणुकीनंतर आरोपीने एचडीएफसी बँकेतून संबंधित रकमेपैकी काही भागावर फिक्स डिपॉझिट केली होती. बँक खाते ‘श्री धावीर कन्स्ट्रक्शन’च्या नावावर असून, आरोपी बांधकाम व्यवसायिक आहे.

पोलिसांनी कोकबन (ता. रोहा, जि. रायगड) येथे शोधमोहीम राबवून तपास सुरू ठेवला. आरोपीस आपल्या मागे पोलीस लागल्याचे समजल्याने तो पळून गेला होता. मात्र, गुप्त बातमीदारामार्फत तुषार वाजंत्री हा पनवेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी पावसात प्रवास करून मोर्वे गावातील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरातून आरोपीस अटक करण्यात यशस्वी झाले.

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆

तुषार वाजंत्री याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तपासात आरोपींच्या विरोधात देशभरात नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर पाच तक्रारी नोंद असल्याचे समोर आले आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार सो, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख आणि उपआयुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!