Homeताज्या बातम्याकोंढव्यातील स्पाईस फॅक्टरी रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जवरुन भांडण ; रेस्टॉरंट मधील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून...

कोंढव्यातील स्पाईस फॅक्टरी रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जवरुन भांडण ; रेस्टॉरंट मधील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण…

कोंढव्यातील स्पाईस फॅक्टरी रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्जवरुन भांडण ; रेस्टॉरंट मधील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण…
 
पुणे :- पुण्यातील कोंढवा भागात असलेल्या नामांकित स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये ग्राहकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मॅनेजर आणि 4 वेटर्सनी मिळून एकाला सर्व्हिस टॅक्सवरुन वाद घालून मारहाण केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली आहे.
सध्या हॉटेल्समध्ये सर्व्हिस टॅक्स आणि चार्जच्या नावाखाली ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे नेहमीच ग्राहक आणि हॉटेल प्रशासनामध्ये वाद निर्माण होतात. या नेहमीच्या वादामुळे अनेक हॉटेल चालकांनी बाऊन्सर्स तैनात केलेले आहेत.
पुण्यातील कोंढवा भागामध्ये असेलल्या हॉटेल स्पाईस फॅक्टरीमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलच्या बिलामध्ये सेवाशुल्क अर्थात सर्व्हिस टॅक्स लावण्यात आलेला होता. त्या सर्व्हिस टॅक्स ला बिलातून काढण्यास ग्राहकाने सांगितले परंतु ते न करता ग्राहकाला अरे रावीची भाषा करण्यात आली. त्यानंतर ग्राहक आणि वेटरमध्ये सुरुवातीला भांडण झालं. त्यानंतर इतर कर्मचारी आणि मॅनेजर भांडणामध्ये पडले.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला मारहाण केली असून ग्राहकानेही बचावाचा मारहाण केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या घटनेत दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली आहे. यानुसार हॉटेल मधील 1 मॅनेजर आणि 4 कर्मचारी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादवी कलम 307, 141, 143, 144, 147, 352, 504 असे कलम लागू करण्यात आले आहेत.
यातील 2 आरोपी अटक झाले आहेत तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.
अश्या मुजोर हॉटेल चालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. कारण जर आज यांना अशीच सूट मिळत राहिली तर यामुळे भविष्यात मोठा परिणाम होऊ शकतो. आणि एखाद्याला मारून टाकण्यास हॉटेल मॅनेजमेंट देखील कमी करणार नाही. 
 
मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील हॉटेल्समध्ये बिलावरुन भांडण होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल्समध्ये बाऊन्सर्स तैनात करण्यात येत आहेत. 
 
सर्व हॉटेल धारकांनी सर्विस टॅक्स बंद करणे आवश्यक असल्याचे चित्र पुण्यात निर्माण झाले आहे. 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!