Homeताज्या बातम्यापुण्याचा महापौर ठरणार 6 फेब्रुवारीला, महापौर निवडीची लगबग सुरु.

पुण्याचा महापौर ठरणार 6 फेब्रुवारीला, महापौर निवडीची लगबग सुरु.

Times Of Maharashtra Desk : राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये अद्याप सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच पुणे महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

6 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारणसभेचे आयोजन

  महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार ही विशेष सभा 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार असून, त्याचबरोबर स्थायी समिती अध्यक्षाचाही निर्णय होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण 165 जागांपैकी 119 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले असल्याने भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, विरोधी पक्ष उमेदवार उभे करणार की या निवडी बिनविरोध होतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  एक बंगला बने न्यारा

नव्या महापौरांच्या स्वागतासाठी पुण्यातील ऐतिहासिक महापौर बंगला सज्ज करण्यात येत आहे. राज्यात 2022 नंतर महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्याने पुण्याला अद्याप नवा महापौर मिळालेला नव्हता. त्यामुळे आता या बंगल्यात रंगकाम तसेच फर्निचरचे काम सुरू करण्यात आले आहे.

हा महापौर बंगला पुण्याच्या बदलत्या इतिहासाचा साक्षीदार ठरला आहे. शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय सर्वप्रथम याच बंगल्यात चर्चेसाठी घेतले गेले आहेत. पुण्याच्या बदलत्या स्वरूपाचा तो साक्षीदार मानला जातो.

यंदा पुण्यात महिला महापौर असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, तसेच पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या ‘लाडक्या बहिणीला’ संधी देतात, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा वाजत-गाजत नवा महापौर या बंगल्यात वास्तव्यास येणार आहे.

पुणे महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ

  • एकूण जागा : 165

  • भाजप : 119

  • शिवसेना (शिंदे गट) : 0

  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : 1

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27

  • काँग्रेस : 15

  • एमआयएम : 0

  • अपक्ष : 0

  • इतर : 0

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!