Homeताज्या बातम्यामुस्लिम समाजाकडून राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान...

मुस्लिम समाजाकडून राहुल डंबाळे यांना मौलाना आझाद समाज भूषण पुरस्कार प्रदान…

पुणे : देशभरातील अल्पसंख्यांक विशेषता मुस्लिमांच्या प्रश्नावर अत्यंत प्रभावी काम करत असल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचा पुणे शहर जिल्हा मुस्लिम समाज च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख व माजी नगरसेवक आयुब शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष हाजी फिरोज शेख,माजी नगरसेवक रईस सुंडके, आबीद शेख, ज्येष्ठ उद्योजक नजीर तांबोळी, माजी नगरसेवक अविनाश साळवे, हिमाली कांबळे, बाळासाहेब जानराव, बापूसाहेब भोसले, अॅड. अय्युब शेख, शैंलेद्र चव्हाण, महेंद्र कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, दलित पॅंथरचे यशवंत नडगम, मौलाना हाशमी, गफूर पठाण, सिध्दीक शेख, शहाबुद्दीन शेख, ॲड.भाई विवेक चव्हाण, मिलिंद आहिरे, अतुल साळवे, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, शहाबुद्दीन शेख, सलिम पटेल, असिफ खान, सिकंदर मुलाणी आदि मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जावेद शेख, सलीम पटेल, आसिफ शेख, मुज्जम्मील शेख व मिनाज मेमन यांनी केले होते. ढोले पाटील रोड येथील आहार बँक्वेट  हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राहुल डंबाळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच देशातील धर्मनिरपेक्षता अद्याप टिकून आहे आणि हिंदू मुस्लिम सलोखा कायम आहे असे स्पष्ट मत रशीद शेख यांनी मांडले.  तर धार्मिक ध्रुवीकरणाला कोणत्याही प्रकारे थारा न देता मुस्लिम व अल्पसंख्यांकांची प्रश्न अत्यंत ताकतीन प्रशासनासमोर मांडून त्यांची सोडवणूक करण्याचा यशस्वी प्रयत्न राहुल डंबाळे हे देशभर करत असल्याची बाब वाखण्याजोगी आहे असे मत आयुब यांनी मांडले.

शहरातील सामाजिक सोलोखा टिकवण्यामध्ये राहुल डंबाळे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मांडले आंबेडकरी विचारांच्या संस्कारामुळेच संविधानातील अल्पसंख्याकांच्या व धर्मनिरपेक्ष तरतुदींची अंमलबजावणी करण्यात कायम आग्रही भूमिका राहुल डंबाळे यांनी घेतली असून आज मुस्लिम समाजाकडून त्यांना देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची मोठी पावती असल्याचे मत परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केले.

जात धर्म भाषा पंथ या सर्वांच्या वर भारताची संस्कृती व भारताचे संविधान आहे त्यामुळे संविधानातील भारत निर्मिती करण्यासाठी आपण सर्वांनीच एकमेकांना साहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!