Homeताज्या बातम्या"संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर., रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका

“संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर., रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका

Maharashtra Assembly Election 2024 : भाजप सरकार संविधान बदलेल, अशी भीती राहुल गांधी घालत असले तरी मी नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. संविधान बदलायची कोणाच्या बापाची हिंमत नाही.

संविधान बदलण्याचा घाट कोण घालत असेल तर माझा समाज त्याला टराटरा फाडून धडा शिकवेल. खोटा प्रचार करून समाज फोडण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगोल्यात केली.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (दि.१४) महायुतीच्या प्रचारार्थ सांगोल्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हे काँग्रेससोबत गेले. परंतु, काँग्रेसने शरद पवारांना प्रधानमंत्री होण्यापासून रोखले आहे, हे विसरून चालणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार शहाजीबापूंनी सांगोला तालुक्यात दलित समाजाचा सर्व प्रकारचा निधी खर्च करून समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. दलित समाजासाठी सुमारे १०० कोटींचा निधी खर्च करून समाजाचा विकास साधला, असेही रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, पाच वर्षांच्या कालखंडात तालुका सुरक्षित ठेवला. तालुक्यातील सर्व समाज घटकांना निधी देऊन विकासाच्या प्रवाहाच्या दिशेने घेऊन जात आहे. तालुक्यात १०० कोटी रुपये निधी आणून मागासवर्गीय समाजासाठी आदर्श असे वसतिगृह करण्याचा संकल्प आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पारोळ्यात ACB ची धडक कारवाई! सहाय्यक अधीक्षक ३ हजारांच्या लाचेसह रंगेहाथ जेरबंद

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : नोकरीसंदर्भातील काम करून देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आरोग्य विभागातील सहाय्यक अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची...

गेवराई येथील बालग्राम अनाथालयातील विकासचा अनुष्कासोबत थाटात विवाह संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : ज्या हातांना कधीकाळी केवळ आधाराची गरज होती, त्या हातांनी आज एका नव्या संसाराची स्वप्ने कवेत घेतली आहेत. गेवराई येथील...

संजय बाबुराव विसपुते यांची भाजपा विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
जळगाव (प्रतिनिधी  विनोद पवार) : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर जिल्हा यांच्या वतीने श्री. संजय बाबुराव विसपुते यांची विश्वकर्मा योजना सेल जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती...

ट्रकच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू मानराज पार्क चौफुली डेथ ट्रॅप

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी सकाळी मानराज पार्क चौफुलीवर झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा...

पॅरालिसिसग्रस्त बक्षू शेख यांच्या मदतीला हिमायत फाउंडेशन २५ हजारांची आर्थिक मदत

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच पॅरालिसिस (पक्षाघात) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या बक्षू शेख यांच्या मदतीसाठी ‘हिमायत फाउंडेशन’...

error: Content is protected !!